आवाज कोकणचा / वैभववाडी
प्रतिनीधी ( अशोक म्हात्रे )
महिला उत्कर्ष समिती वैभववाडी तालुक्याच्या वतीने वैभववाडी पोलीस स्टेशन येथे रक्षाबंधन सण उत्साहात साजरा..
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या वैभववाडी तालुका उपाध्यक्षा सुमित्रा साळुंखे यांच्यासह सहकारी पदाधिकारी व सदस्या अक्षता साळुंखे, अश्विनी साळुंखे, छाया साळुंखे ,पूर्वा गायकवाड ,नेहा रावराणे ,अंकिता साळुंखे, वेदिका साळुंखे, वैष्णवी जठार या भगिनींनी बहिण भावाच्या पवित्र नात्याचा व भावाकडून सुरक्षेची हमी देणारा रक्षाबंधन सण उत्साहात संपन्न झाला.
वैभववाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व जवानांना राखी बांधून सर्वांनी या सणाचे महत्त्व जपले. पोलीस जवान हे नेहमीच समाजात शांतता व सुरक्षितता राखण्याचे कार्य करत असतात परंतु रक्षाबंधन सण हा अनादी काळापासून बहिण भावाच्या पवित्र नात्याचा व बहिणीची सुरक्षा करण्यासाठी भावाने दिलेले वचन निभावण्याचा सण म्हणून साजरा केला जातो .
पोलीस बांधव हे समाजातील अशा सर्वच बहिणींची सुरक्षा करण्यासाठी तत्पर असतात.
Comments
Post a Comment