आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी
महिला उत्कर्ष समिती उलवे चा पोलीस जवानांसोबत रक्षाबंधन सण साजरा
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे नोड विभागातील भगिनींनी न्हावा शेवा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर भोसले यांच्यासह रवी पवार , मनोज जाधव, वृषाली मोकल आदी जवानांना राखी बांधून आपला रक्षाबंधन सण साजरा केला.
यावेळी प्रदेश सचिव एडवोकेट दिव्या लोकरे यांच्यासह समितीच्या सहकारी भगिनी उलवे नोड अध्यक्ष विनश्री कदम , सचिव प्रमिला सातपुते, सीवूड अध्यक्ष संगीता शेटे व वंदना मोरे उपस्थित होत्या.
यावेळी उपनिरीक्षक सुधाकर भोसले यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व म्हणाले की आपल्या संस्कृतीचा हा सण बहिणीच्या सुरक्षिततेची हमी देणारा असून पोलीस या नात्याने आमच्या कार्यक्षेत्रातील सर्वच बहिणींना सुरक्षित वावरता यावे यासाठी पोलीस दल वचनबद्ध आहे.
महिला उत्कर्ष समितीच्या बहिणींनी आम्हा पोलीस बांधवांना राखी बांधून आमच्या कर्तव्याप्रति कार्यतत्पर राहण्यासाठी उद्युक्त करणारा क्षण आहे .
Comments
Post a Comment