पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या कोरकमिटी मेंबर ची निवड जाहीर.....

 पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनच्या कोरकमिटी मेंबर ची निवड जाहीर.....

आवाज कोकणचा/वैभव पाटील

शुक्रवार दिनांक  ०४ ऑगस्ट 2023 रोजी  पनवेल डॉक्टर्स जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या बोर्ड मेंबर्स व कोअर कमिटी सभासदांसाची सभा शासकीय विश्रामगृह पनवेल येथे उत्साहात पार पडली. यावेळेस 50 हून अधिक मेंबर्स उपस्थित होते. प्रथम निवडून आलेल्या पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिसला असोसिएशनच्या नवनिर्वाचित कमिटीचे अभिनंदन व सत्कार करण्यात आला यावेळेस नवीन कोर कमिटी मेंबर्स तसेच ज्या मेंबर्स ने प्रामाणिकपणे काम केले होते अशा  कोर कमिटी मेंबरची परत निवड जाहीर करण्यात आली. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल यांच्या अध्यक्षतेखाली संघटनेचा वाढता आलेख त्यांचे नेतृत्व कौशल्य व निर्भीड वृत्ती व संघटनेत असलेले पारदर्शकता या सर्व गोष्टीन मुळे असोसिएशन वाढीसाठी फार महत्त्वाच्या आहेत यावेळेस डॉक्टर वैभव मोकल यांनी संघटना का असावी संघटनेचे फायदे व त्यामुळे आपण आपल्या मेंबर्स वर होणाऱ्या अन्यायाला कसे सामोरे जाऊ शकतो या सर्व संदर्भात त्यांनी आपले विचार सर्व सदस्यांसमोर मांडले व तसेच यांनी सर्व नवीन कोर कमिटी सभासदांचे अभिनंदन केले.

असोसिएशन तर्फे दरवर्षी वृक्षारोपण करण्यात येते, यावर्षी दिं. १३ ऑगस्ट 2023 रोजी रोजी वृक्षारोपण करण्यात येणार आहे. तसेच स्वातंत्र्यदिन सुद्धा साजरा करण्यात येणार आहे. दरवर्षी होणाऱ्या *SPARDHA* या कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी चर्चा करण्यात आली.  तसेच संघटनेमार्फत सर्व मेंबर्सना विमा कवर देण्यात येणार आहे या विमा कव्हर मध्ये आपातकालीन एखाद्या डॉक्टर्स मेंबर्सला चा नैसर्गिक किंवा एक्सीडेंटल निधन झाल्यास तक्षणी 48 तासात त्याच्या वारसास एक लाख रुपये लगेच देण्यात येणार आहेत.तसेच आपले डॉक्टर्स हे आपल्या व्यवसायासाठी प्रवास करत असतात अशा प्रवासात त्यांना काय झाल्यास तर अशा सर्व मेंबर्सना दहा लाखाचा एक्सीडेंटल विमा देण्याचे ठरवण्यात आले आहे. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल, उपाध्यक्ष डॉ. सागर चौधरी, सचिव डॉ. रविंद्र राऊत, खजिनदार डॉ. संदेश बहाडकर, सह - खजिनदार डॉ. सागर ठाकुर, बोर्ड मेंबर - डॉ. अनघा चव्हाण, डॉ. गजेंद्र सिलिमकर, डॉ. सुदर्शन मेटकर, डॉ. सचिन पाटील,

  


याच बरोबर नवीन कोअर कमिटी मेंबर्स -डॉ. सचिन मोकल, डॉ. विवेक महाजन, डॉ. स्वप्निल लोखंडे, डॉ. शीतल सोमवंशी, डॉ. इंदिरा चव्हाण, डॉ. कांचन माळवी, डॉ. अर्चना चौधरी, डॉ. मेघा नाईक, डॉ. रुपाली धनावडे, डॉ. सुलक्षणा माडे, डॉ. वैष्णवी जोशी, डॉ. वैशाली पाटील, डॉ. पुजा तिरमाळे, डॉ. हर्षल पाटील, डॉ. आशिष भगत, डॉ. विवेक देवकाते, डॉ. स्वप्निल बाविस्कर, डॉ. दीपक पुकाळे, डॉ. राजेश म्हात्रे, डॉ. योगेश भोंडकर, डॉ. सुनिल मुंबईकर, डॉ. निनाद भोपी, डॉ. पुजारी, डॉ. वैभव पाटील , डॉ दिनेश धनावडे डॉ. श्रेया पाटील डॉ. वैशाली जोशी डॉ. अक्षया ठाकूर उपस्थित होते. उपस्थित सर्व डॉक्टरांचे आभार सचिव डॉ रवींद्र राऊत यांनी मानले.



Comments

Popular posts from this blog