आवाज कोकणचा / कुडाळ
प्रतिनीधी / अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती कुडाळ तालुका अध्यक्षा सौ. दीपा ताटे यांचे सहकाऱ्यांसह ओरस येथे रक्षाबंधन
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कुडाळ तालुका अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह समाजात शांतता सुरक्षा व कायदा सुस्थितीत राहण्यासाठी नेहमी कर्तव्य तत्पर असणाऱ्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण उत्साहात पार पाडला.
ओरोस येथील पोलीस ठाण्यामध्ये महिला उत्कर्ष समितीच्या पदाधिकारी व सचिव तन्वी सावंत, सदस्य रूपाली वरक, सुप्रिया वालावलकर, सुस्मिता राणे यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठिकाण ओरोस येथील पोलीस ठाण्यामधील पोलीस जवानांना राख्या बांधून आपली संस्कृती जपली.
अनेक वेळा हे पोलीस बांधव आपल्या कुटुंबापासून परिवारापासून दूर राहून समाजातील भगिनींचे रक्षण करण्यासाठी अहोरात्र झटत असतात रक्षाबंधन हा सण म्हणजे भावाने बहिणीच्या सुरक्षिततेची दिलेली हमी असते.
Comments
Post a Comment