पालपेणे कुंभारवाडी येथील सुकन्या डॉ. कु. धनश्री दिनेश साळवी हिचा मनसे गुहागरच्या वतीने सत्कार
वरवेली वार्ताहर-
गुहागर तालुक्यातील पालपेणे कुंभारवाडी येथील सुकन्या डॉ. कु.धनश्री दिनेश साळवी एम.बी.बी.एस. (रशिया) हिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना, गुहागरच्या वतीने तिच्या राहत्या घरी जाऊन सत्कार करण्यात आला. रशिया सारख्या प्रगत देशात एम.बी.बी.एस.शिक्षणं पुर्ण करणारी गुहागर तालुक्यातील ती एकमेव असून तिचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी डॉ.कु. धनश्री हिचे वडिल दिनेश साळवी, तिची आई दीप्ती साळवी, मनसे विभाग अध्यक्ष अमित खांडेकर, पत्रकार गणेश किर्वे, विवेक माडगुळकर,
संतोष टाणकर, प्रशांत साटले,तेजस टाणकर, तुषार शिरकर, ऋतिक गावणकर, सुरज कदम आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. धनश्री साळवी हिने मनसेच्या वतीने सत्कार केल्याने त्यांचे आभार व्यक्त केले. तिने स्त्रीरोगतज्ञ होणार असल्याची इच्छा व्यक्त केली.
Comments
Post a Comment