प्रतिनीधी / दिनांक 1 ऑगस्ट 23
एन आर आय नवी मुंबई पोलीस ठाणे येथे महिला उत्कर्ष समितीचा रक्षाबंधन सोहळा
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र च्या अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांनी आपल्या सहकारी भगिनींनसह नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत एन.आर.आय. पोलीस ठाणे येथे पोलीस जवानाना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
एन .आर .आय. पोलीस ठाण्याचे पी.एस.आय. सोमनाथ मदने, ए.पी.आय. तुषार गुरव , ए.पी.आय. संजय चव्हाण , हेड कॉन्स्टेबल कुमार चंदनशिवे, पोलीस कॉन्स्टेबल सुरेश पाटील व प्रशांत कामरे या पोलीस जवानांना महिला उत्कर्ष समिती प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे , सिवुड अध्यक्षा संगीता शेट्टी, उलवे नोड सचिव प्रमिला सातपुते, सदस्य सुजाता कांबळे व ललिता बने यांनी पोलीस ठाण्यात जाऊन सामाजिक शांतता व सलोखा अबाधित राखण्यासाठी तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सदैव तत्पर असणाऱ्या व विशेषतः महिलांच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेतलेल्या पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण साजरा केला.
Comments
Post a Comment