आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनीधी / अशोक म्हात्रे
दिनांक : 3 सप्टेंबर 2023
न्हावा शेवा पोलीस ठाण्यात महिला उत्कर्ष समिती तर्फे रक्षाबंधन सण साजरा
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई अध्यक्षा सौ .सुजाता दिनेश कडू , रायगड जिल्हा अध्यक्षा रेखा घरत यांच्यासह समितीच्या सदस्यांनी नवी मुंबई पोलीस ठाणे अंतर्गत
न्हावाशेवा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक श्री संजय धुमाळ सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री शांताराम लेंडे व उपस्थित इतर पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन सण पार पाडला .
आपल्या संस्कृतीचे अविभाज्य अंग असलेला रक्षाबंधन सण म्हणजेच बहीण भावाच्या पवित्र नातेसंबंधाचे व बहिणीला तिच्या रक्षणाची जबाबदारी पार पाडण्याचे भावाचे
नाते असा हा पवित्र सण महिला उत्कर्ष समितीच्या वरील पदाधिकाऱ्यांसह सौ . आश्रया शिवकर, सौ श्वेता तांडेल , सौ. योगसाधना पाटील व रंजना तांडेल यांनी राखी बांधून साजरा केला.
Comments
Post a Comment