आवाज कोकणचा / पनवेल

पत्रकार उत्कर्ष समिती,महाराष्ट्र राज्य तर्फे राज्यस्तरीय पर्यावरण सोहळा २०२३ राज्यभर पंधरवडा  साजरा होणार....

पनवेल ता.२९ (प्रतिनिधी अशोक घरत) :

बदलणारं वातावरण आणि कोविड काळात ऑक्सिजनचा साठा कमी पडल्या कारणाने,पत्रकार उत्कर्ष समिती राज्यस्तरीय पर्यावरण सोहळा म्हणून दि.२९ ऑगस्ट ते दि.१३ सप्टेंबर सलग पंधरा दिवस हा उपक्रम शाळा,कॉलेज,महाविद्यालय,पोलीस स्टेशन व शासकीय कार्यालय असलेल्या विविध ठिकाणी राज्यभर राबवणार आहे.


"झाडे लावा....झाडे जगवा " ही संकल्पना समोर ठेवून मंगळवार (ता.२९) पासून पहिली सुरुवात कामोठे येथील दि.बा.पाटील न्यू इंग्लिश स्कूल येथून झाली.या शाळेच्या खुल्या प्रांगणात मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड करण्यात आली.वृक्ष लागवड करत असताना या शाळेचे प्राध्यापक चालके सर,समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे,उपाध्यक्ष संदीप मुळीक,रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील भोईर,  नवी मुंबई उपाध्यक्ष धनंजय सेंगर  तसेच शिक्षक आणि विद्यार्थी वर्ग या सर्वांच्या उपस्थित तसेच त्यांच्या शुभहस्ते वृक्ष लागवड करण्यात आले.

यावेळी रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील भोईर बोलताना म्हणाले शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे झाडांची खूप मोठ्या प्रमाणात कत्तल झाली आहे.त्यामुळे "झाडे लावणे" ही आजच्या काळाची गरज झाली आहे. कोरोना काळात अनेक लोकांकडे पैसे असून सुद्धा हॉस्पिटलमध्ये माणसाला ऑक्सिजन मिळत नव्हता.यासाठी सर्वांनाही एक तरी झाड हे लावलेच पाहिजे.असे प्रतिपादन भोईर यांनी केले.



नंतर दुपारी पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्या सूचनेनुसार जे.एन.पी.टी.रोड माताजी टेकडी मंदिर परिसर,ज्या ठिकाणी वायरलेस कंट्रोल आहे,त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड कार्यक्रम पत्रकार उत्कर्ष समिती आणि पनवेल शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने पार पडला. या वृक्ष लागवडीमध्ये २४ तास ऑक्सिजन देणारे वड,पिंपळ,कडूलिंब तसेच पक्ष आणि प्राणी यांच्यासाठी फळांची झाडे उदा.फणस,जांभूळ, आंबा व इतर औषधोपयोगी झाडे लावण्यात आली.



याप्रसंगी पनवेल शहर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी बजरंग राजपूत साहेब म्हणाले पनवेल शहर पोलीस स्टेशन व नवी मुंबई पोलीस स्टेशन यांच्यातर्फे पत्रकार उत्कर्ष समितीने पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्षारोपण हा कार्यक्रम अतिशय चांगला राबविला आहे,त्याबद्दल त्यांनी सर्वात प्रथम समितीने सुरू केलेल्या वृक्षारोपण या उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत केले आणि तितकेच आभारही मानले व पुढे हेही म्हणाले की आपल्या समितीने लावलेली झाडे,त्यांना पाणी घालून जगवण्याचे काम आमचंच राहील,असे खात्रीचे आश्वासनही त्यांनी दिले.तसेच लावलेल्या वृक्षाने हा परिसर सुशोभित ठेवण्याचा प्रयत्नही आमचा नक्कीच राहील.
तसेच आम्हाला आजच्या वृक्षारोपण कार्यक्रमात उपस्थित राहून,या सोनेरी कार्यक्रमाचे साक्षीदार होण्याचा आम्हाला मान मिळाला,त्याबद्दलही आम्ही सारे आपल्या समितीचे अत्यंत आभारी आहोत.नुसती झाडे लावू नका,तर त्या लावलेल्या झाडांचे संगोपनही तितकेच झाले पाहिजे.तरच ती झाडे जगतील आणि मोठी होतील.झाडे जगली तर पर्यावरण चांगले राहण्यास आपल्याला मदत होईल.आपल्या या उपक्रमातून साऱ्या मानव जातीस खूप सारा फायदा होऊ शकतो.
या कार्यक्रम प्रसंगी पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे बोलताना म्हणाले वृक्षारोपणाचा हा उपक्रम कामोठे येथील एका शाळेतून सुरू केला असून,तो पुढे सलग पंधरा दिवस आमचे पत्रकार उत्कर्ष समितीचे पत्रकार आणि पदाधिकारी जिथे जिथे असतील तिथे तिथे हा कार्यक्रम होत राहील.कोविड काळात आपल्याला ऑक्सिजनची खूप गरज भासली होती.तेच ऑक्सिजन आज आपल्याला निर्माण करायचे असेल तर आपल्या देशाचे एक सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने वृक्षारोपण हे केलेच पाहिजे.असे मला या उपक्रमाद्वारे सांगावेसे वाटते.वृक्षारोपण करणे ही आजच्या काळाची गरज झाली आहे. आजचं बदलणारं वातावरण, ज्यांच्यामुळे काही ठिकाणी महापूर,तर काही ठिकाणी आज दुष्काळ अशी कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी अतिउष्ण परिस्थितीही दिसून येत आहे.आपल्या भारत देशाची लोकसंख्या १४० करोड एवढी आहे.प्रत्येक व्यक्तीने एक जरी वृक्ष(झाड)लावला,तरी एका वर्षात १०० करोड झाडे होतील आणि जगतीलही.हाच एक सुंदर मेसेज या उपक्रमाद्वारे देण्याचा आमचा हा प्रयत्न उत्कर्ष समितीचा राहील.आज आमच्या विनंतीला मान देऊन या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला सहकार्य केलेत,त्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे साहेब आणि बजरंग राजपूत साहेब यांचे पत्रकार उत्कर्ष समितीच्या वतीने आभार मानले.
       या कार्यक्रमासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे,सचिव डॉ.वैभव पाटील,उपाध्यक्ष संदीप मुळीक,नवी मुंबई अध्यक्ष निलेश उपाध्याय ,  राज्य संघटक डॉन एन.के.के, नवी मुंबई उपाध्यक्ष धनंजय सेंगर, कोकण अध्यक्ष अलंकार भोईर, . , खालापूर अध्यक्ष चंद्रकांत मुंढे , महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्  उपाध्यक्षा आरती पाटील, रायगड उपाध्यक्षा करुणा पाटील व इतर पदाधिकारी वर्ग उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog