आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनीधी /  अशोक म्हात्रे 

उलवे मध्ये सकल मराठा समाजाचा निषेध मोर्चा

          नवी मुंबईतील उलवे येथे सकल मराठा समाजातर्फे नरेंद्र देशमुख यांच्या आवाहनानुसार निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.


मराठा समाजाने या अगोदर अनेक वेळा शांततेत मोर्चे काढले होते त्यावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडला नव्हता परंतु अंतरवाली सराटी येथे आयोजित मोर्चाच्या वेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीमार केला ज्यामध्ये अनेक आंदोलक गंभीररित्या जखमी झाले .याचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. 

यावेळी नरेंद्र देशमुख यांच्यासह गणेश कडू संकल्प घरत , हितेश शिंगरे , अजय गडकर,  आकाश देशमुख , सचिन येरूनकर यांनी आपली मते मांडली. 

यावेळी बोलताना बहुतांश आंदोलकांची हीच मागणी होती की मराठा समाजाला सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे तसेच या अगोदर झालेल्या मोर्चाच्या वेळी अनेक आंदोलकांवर गुन्हे दाखल आहेत ते गुन्हे काढून घ्यावेत.

अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराचा निषेध व्यक्त करतानाच त्यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशीही मागणी आंदोलकांनी केली.

हा मोर्चा सेक्टर 19 शिवाजी चौक उलवे रोड येथे आयोजित केला होता यावेळी मराठा आंदोलकांसह समाजातील इतर जाती धर्माच्या जनतेने या मोर्चात उस्फूर्त सहभाग नोंदवला. कर्तव्यावर उपस्थित पोलीस बांधवांनी सुद्धा सहकार्याची भूमिका राखली.




 

Comments

Popular posts from this blog