आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग पदाधिकारी निवड जाहीर
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभागीय पदाधिकाऱ्यांची निवड पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडलेल्या सभेत सिंधू रत्नांची निवड करण्यात आली.
कणकवलीतील समाजसेविका व महिलांप्रती तळमळीने कार्य करणाऱ्या सौ . ज्योतिका हरियाण
यांची पालघर ते सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश असलेल्या कोकण विभागीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली.कुडाळ रहिवासी व उद्योजिका दीपा ताटे यांची सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी,
समाजसेविका नेहा कोळंबकर या सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्षपदी
बचत गटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणाच्या मार्ग दाखवणाऱ्या स्नेहा शेळके यांची कणकवली तालुका अध्यक्षपदी
तन्वी सावंत यांची कुडाळ तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
या दूरदृश्य प्रणाली सभेसाठी महिला उत्कर्ष समिती कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर, प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे, वैभववाडी अध्यक्षा सौ. रश्मी रावराणे, नवनियुक्त नवी मुंबई अध्यक्षा सौ . वर्षा लोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment