आवाज कोकणचा/ नवी मुंबई
अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई अध्यक्षपदी वर्षा लोकरे यांची निवड
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे आयोजित सभेमध्ये पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक ल. म्हात्रे यांनी नवी मुंबई निवासी सामाजिक कार्यकर्त्या सौ .वर्षा लोकरे यांची नवी मुंबई अध्यक्षपदी निवड जाहीर केली .
या सभेसाठी महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर, प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे , नवनियुक्त कोकण अध्यक्ष सौ ज्योतीका हरयाण, उलवे नोड अध्यक्षा विनेश्री कदम, सचिव प्रमिला सातपुते यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.
या सर्वच महिला प्रतिनिधी महिलांवर होणारे अन्याय अत्याचार तसेच समाजसेवा यासाठी नेहमीच कार्यतत्पर असतात. यांच्या या निवडीमुळे नवी मुंबई परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment