आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे
महिलासखी स्नेहा शेळके महिला उत्कर्ष समितीच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी
पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडलेल्या सभेत कणकवली येथील महिलासखी सौ. स्नेहा शेळके यांची पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कणकवली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सौ. शेळके या बचत गटांच्या माध्यमातून तालुक्यासह जिल्हयातील गरीब गरजू महिलांना एकत्रीत आणून आर्थिक दृष्ट्या सक्षमीकरणाचा मार्ग दाखवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्नशील असतात.
त्यांच्या या कार्याची दखल घेत डॉ. म्हात्रे यांनी त्यांची निवड घोषित केली.
यांच्या या निवडीमुळे तालुक्यासह समाजातील विवीध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
या दूरदृश्य प्रणाली सभेसाठी महिला उत्कर्ष समिती कार्याध्यक्ष सौ श्रुती उरणकर, प्रदेश सचिव ॲड. दिव्या लोकरे, कोकण अध्यक्षा सौ. ज्योतिका हरयान, सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष सौ दीपा ताटे , उपाध्यक्ष सौ नेहा कोळंबकर , कुडाळ तालुका अध्यक्ष सौ. तन्वी सावंत, वैभववाडी तालुका अध्यक्ष सौ .रश्मी रावराणे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व सदस्य उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment