आवाज कोकणचा / नवी मुंबई
निलेश उपाध्याय.      
        
 शिवछाया मित्र मंडळाने साकारला भव्य गजमहाल.   
नवी मुंबई दि. 23




                  तुर्भे नवी मुंबई येथील शिवछाया मित्र मंडळ या वर्षी ५३ वा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करीत असून भव्य व आकर्षक "गजमहल" हे या गणेशोत्सवाचे आकर्षण ठरला आहे. 

सभामंडपात सुमारे ८० फुट लांब, ४० फूट रुंद व २५ फूट उंच अशा आकाराचा गजमहलचा देखावा असून यात श्री गणेशाची दहा फूट उंचीची मूर्ती विराजमान आहे. गजमहलचा हा भव्य देखावा अंबरनाथ येथील राम कदम यांनी साकारला असून नवी मुंबईच्या राजाची मूर्ती मूर्तिकार कृणाल डिंगणकर यांनी घडवली आहे. 



सालाबादप्रमाणे या वर्षीही
भजन, हरिपाठ, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर, आयुर्वेदिक चिकित्सा व औषधोपचार, अन्नदान, अथर्वशीर्ष वाचन, सत्यनारायण महापूजा तसेच नवी मुंबईतील ५३भजनी बुवा भजनी कलावंतांचा यथोचित सन्मान अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून  गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना पोस्टरच्या माध्यमातून स्वच्छतेचं महत्व पटवून देण्याचा प्रयत्नही या माध्यमातून केला आहे. याच बरोबर भारतीय अंतराळ संशोधन  केंद्राने प्रक्षेपित केलेल्या चंद्रयान - ३ या मोहिमेची माहितीही भाविकांना दिली जात आहे.
         शिवछाया मित्र मंडळ आयोजित नवी मुंबईच्या राजाची नवसाला पावणारा राजा म्हणून सर्वत्र ख्याती असून नवी मुंबईच्या या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षी नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, भिवंडी, पेण, पनवेल, अलिबाग परिसरातील  ८ ते १० लाख भाविक येत असतात. या वर्षीही हा उत्साह कायम आहे, उपक्रमाविषयी माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अंकुश वैती यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog