आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनीधी / अशोक म्हात्रे



आदर्श कीर्तनकार ह. भ .प.  मनोज महाराज ठाकूर यांनी प्रबोधनात्मक विचारातून कुप्रथांवर ओढले आसूड...


                  श्रीराम मंदिर मंदिर कोळी समाज व्यवस्थापन कमिटी आयोजित अखंड हरिनाम सप्ताह श्री राम मंदिर गव्हाण येथे नारळी पौर्णिमा ते गोकुळाष्टमी असा संपन्न होत आहे. 
 
         मंगळवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी आदर्श कीर्तनकार ह. भ. प. श्री मनोज महाराज ठाकूर यांचे सुश्राव्य  कीर्तन होते .
     या कीर्तनातून समाजाचे प्रबोधन करताना अनेक कुप्रथा व वाईट चालीरीतींवर आसूड ओढतानाच समाजाने अध्यात्मा सोबत विज्ञानाची कास धरण्याचे आवाहन केले.                 भारतीय संस्कृती ही अनादी काळापासून अस्तित्वात असून समाज वेळोवेळी प्रगल्भ व  विकसित होत आहे . 
         आजचे मानवी जीवन अतिशय गतिमान झाले असून मानव भौतिक सुखाकडे वळत आहे यावर प्रबोधन करताना मनोज महाराजांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज व पुराणातील अनेक उदाहरणे देत आजच्या विज्ञानयुगा सोबत त्याची सांगड घालून मानवी जीवन अधिक सुसह्य कसे होईल याकरिता अध्यात्म कसे कार्य करते हे उपस्थित श्रोत्यांना  पटवून दिले.
     अतिशय सोप्या पद्धतीने विचार मांडण्याची पद्धतीमुळे श्रोते मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. 


Comments

Popular Posts