अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती कोकण विभाग उपाध्यक्षपदी सौ सुजाता दिनेश कडू यांची नियुक्ती
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या दूरदृश्य प्रणाली द्वारे पार पडलेल्या सभेत पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली व महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत महिलांचे आर्थिक सक्षमीकरण तसेच महिलांवरील अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठून न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत असणाऱ्या सौ . सुजाता दिनेश कडू यांची कोकण विभागीय उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी बोलताना सुजाता कडू यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की सद्यस्थितीत समाजात महिलांवरील अत्याचारात वाढ झाल्याचे निदर्शनास येते यासाठी महिलांना स्वसंरक्षण कसे करावे याबाबत प्रशिक्षण वर्ग राबवले पाहिजेत तसेच महिलांनी समाजाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची गरज त्यांनी नमूद केली .
आर्थिक सक्षमीकरण ही काळाची गरज गरज असून महिला उत्कर्ष समितीच्या माध्यमातून योग्य ते मार्ग निवडले जातील असेही त्या म्हणाल्या.
या दूरदृश्य सभेसाठी सर्वच नवनियुक्त पदाधिकारी प्रदेश कार्यकारी अध्यक्ष सौ . श्रुती उरणकर , प्रदेश सचिव ॲड . दिव्या लोकरे, कोकण अध्यक्ष सौ. ज्योतीका हरयाण, नवी मुंबई अध्यक्ष सौ. वर्षा लोकरे, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ. दिपा ताटे, कणकवली तालुका अध्यक्षा सौ. स्नेहा शेळके, कुडाळ तालुका अध्यक्ष तन्वी सावंत, उलवे नोड अध्यक्ष विनश्री कदम, सचिव प्रमिला सातपुते यांच्यासह इतर सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
सौ सुजाता कडू यांच्या या निवडीमुळे समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
Comments
Post a Comment