आवाज कोकणचा / मुंबई
प्रतिनीधी
राज्य पातळीवर कराटे स्पर्धांचे आयोजन राजेन्द्र लकेश्री यांची उपस्थिती ....
==========================
महाराष्ट्र युनियन गोजूरी यू कराटे ही असोसिएशन व्दारे महाराष्ट्रातील शालेय व महाविद्यालयातील सर्व गोजूरी यू कराटे खेळाडूंसाठी स्पर्धेचे आयोजन राज्यपातळीवर करण्यात आले होते.
या स्पर्धा प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुल विलेपार्ले, मुंबई या ठिकाणी आयोजीत राष्ट्रीय स्तरावरील कराटे स्पर्धेसाठी खेळाडू तयार व्हावेत या उद्देशाने घेण्यात आली होती.
सदर स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील २५० खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
महाराष्ट्र युनियन गोजूरीया डी असोसिएशनचे क्योशी अध्यक्ष श्री.भिमराव पवार यांनी करून सदस्य राज्य स्तरीय स्पर्धेचा आढावा सादर केला.
तर धीरज पवार यांनी स्पर्धेसाठी उपस्थित पाहुणे श्री.गोविंदराव पवार कृषी भूषण महाराष्ट्र शासन, पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई अध्यक्ष , शिवछत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त श्री.राजेंद्र लकेश्री तसेच समाजसेविका सौ.सुरक्षा घोसाळकर, क्रीडा संकुलचे अध्यक्ष श्री.अरविंद प्रभू श्रीमती निशा टामके, हेमंत अनुमाला व श्रीहरी गोसीकोंडा यांना सन्मानचिन्ह देवून त्यांचे यथोचित स्वागत केले.
या संपूर्ण स्पर्धेचे आयोजन श्री.सिंहान, श्री.धीरज पवार, गणेश दळवी, अमित काटकर, किरण खोत, कुणाल रहाटे, सिहांत जहांगीर श्रॉफ, प्रेम खडका, आर पी करोटिया, सुरेश जाधव, मित्त्तल दोशी आणि चेतन जडेजा यांनी उत्तम प्रकारे केले होते.
तर कराटे स्पर्धेसाठी पंच म्हणून नवीन कामीनला ( तेलंगण ), शंकर विश्वकर्मा, बलराम जेन्हा, दिनेश दळवी, अभिषेक सांवत, श्याम कदम, श्रेयसी पवार, ऋतुजा भगत यांनी कामकाज सांभाळले तर प्रमुख पंच म्हणून कर्नाटकातील सेन्साई श्री. कश्यप, आंध्रप्रदेशचे श्री.जगदीशकुमार यांनी आपली कामगिरी चोखपणे पार पाडली.
शेवटी असोसिएशनचे अध्यक्ष श्री.भिमराव पवार यांनी पुढील वर्षी सदर कराटे स्पर्धा या राष्ट्रीय पातळीवर भरविण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
Comments
Post a Comment