आवाज कोकणचा / पनवेल
प्रतिनीधी / अशोक घरत
अल्पवयीन अपहृत ? मुलीचा शोध घेण्याची पत्रकार उत्कर्ष समितीची मागणी....
विकसनशील नवी मुंबईच्या आजूबाजूचा परिसर झपाट्याने विकसित होत असून या ठिकाणी अनेक गावांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनी आपले बस्तान मांडले आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन ची कामे वेग घेत आहेत मात्र बांधकामासह इतर कामासाठी लागणारे मनुष्यबळ उपलब्ध होत नसल्याकारणाने कर्नाटक, मध्यप्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश सह देशाच्या अनेक राज्यातून मजूर आणले जातात. बाहेरील राज्यातून आलेले हे कामगार काम मिळवण्यासाठी इकडे येतात खरे मात्र पैसे कमवण्या बरोबर अनेक वेळा गुन्हे करत असल्याचे निदर्शनास येते .
अधिक माहिती अशी की पनवेल तालुक्यांतील डेरवली गावात यश होम डेव्हलपर्स या बांधकाम व्यावसायिकाचे बिल्डिंगचे बांधकाम सुरू आहे. त्या बिल्डिंग बांधकामासाठी कर्नाटक मधून उदरनिर्वाहसाठी आलेले एक अत्यंत गरीब कुटुंब आपली पत्नी आणि दोन मुलांसोबत कामास असुन बिल्डिंग बांधकाम सुरू असलेल्या आवारात वास्तव्यास आहे. आहे. अल्पशिक्षित मुलीचे वय ११ वर्ष असून ती घर सांभाळण्याचे काम करत असायची .
त्याच परिसरात मध्य प्रदेशातील एक पेंटिंग करणारा कामगार राहण्यास होता. शुक्रवार ता. ०१ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ते कुटुंब आपल्या घरात साडेसात वाजता जेवायला बसलेले असताना त्या मुलीने तिच्या वडिलांना जेवण जेवायला वाढले आणि काही वेळाने वडिलांनी त्या मुलीला पिण्याचे पाणी आणण्यासाठी पुन्हा आवाज दिला. पाणी मागितल्यानंतर त्यांच्या मुलीचा घरातून आवाज आला नाही. ते उठून घरात मुलीला पाहायला गेले असता,त्यांना त्यांची मुलगी घरात नसल्याचे समजले. तेव्हा त्या मुलीचा त्यांनी घराबाहेर शोध घेण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या वडिलांना कोणीतरी तेथे येऊन सांगितले,की तुमची मुलगी एका रिक्षामध्ये त्या पेंटर बरोबर जाताना दिसली .
त्या मुलीचे आई वडील दोन दिवस तिचा शोध घेत राहिले. हरवलेल्या मुलीचा काहीच पत्ता लागला नाही. शेवटी त्यांनी ०३ सप्टेंबर रोजी पनवेल तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यासाठी धाव घेतली. घडलेली सर्व हकीगत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथील अंमलदार यांना सांगितली. मुलगी हरवल्याची रीतसर गुन्हा नोंद केला असला तरी आजपर्यंत मुलीचा ठाव ठिकाणा लागला नाही. त्यामुळे मुलीच्या आई-वडिलांची चिंता वाढू लागली आहे. यासंदर्भात पत्रकार उत्कर्ष समितीचे पनवेल तालुका सदस्य आदित्य वाघ यांना माहिती मिळताच पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष अशोक म्हात्रे , पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत, महिला उत्कर्ष समिती प्रदेश संघटक सौ नीता माळी यांनी पनवेल ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री शेलटकर यांची भेट घेऊन सदर मुलीचा तातडीने शोध घेण्याचा व दोषी व्यक्तीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली.
Comments
Post a Comment