आवाज कोकणचा / नवी मुंबई
निलेश उपाध्याय
नवी मुंबईत ‘गुजरात भवना’च्या स्थापनेचा रौप्यमहोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
08 ऑक्टोबर रोजी नवी मुंबईतील वाशी येथे गुजरात भवनच्या स्थापनेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त गुजरात भवनच्या विद्यमान विश्वस्तांनी एका भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले होते.गुजरात भवन समितीचे अध्यक्ष श्री.हसमुखभाई कनानी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की आज आपण पाहत आहात ते भव्य संकुल उभारण्यासाठी इतकी वर्षे अहोरात्र अथक परिश्रम करणाऱ्या सर्व देणगीदारांचे आम्ही आभारी आहोत.
रौप्यमहोत्सवी सोहळा सायंकाळी ५:०० वाजता सुरू झाला, सर्वप्रथम तन मन धनाच्या सर्व देणगीदारांचे मंचावरून आभार मानण्यात आले, त्यानंतर गुजरात सरकारचे मान्यवर मंत्री व कमिटी मेंबर नी आपली मनोगत व्यक्त केली त्यानंतर गणपती वंदना जाळी सोबत केक कापून रौप्यमहोत्सव साजरा करण्यात आला.त्यानंतर सर्वांसाठी भोजन प्रसादाची व्यवस्था होती व रात्री वाशी चा विष्णुदास भावे सभागृहात सांस्कृतिक प्रोग्राम आयोजित केला होता
संस्थापक विश्वस्त श्री कनूभाई काना नी यांनी आमच्या प्रतिनिधीला सांगितले की, मला खूप आनंद होत आहे की ही नवीन समिती अतिशय सुंदर पद्धतीने, नवी मुंबईतील सर्व गुजराती समाजाला एकत्र करून अतिशय चांगले काम करत आहे आणि अतिशय चांगले आयोजन करत आहे.
या आयोजनासाठी खास अमेरिकेहून आलेले तत्कालीन समिती सदस्य श्री पिनाकीन भाई पटेल म्हणाले की सध्याच्या गुजरात भवनाचा परिसर आणि नाव पाहून मला अभिमान वाटतो
गुजरात भवन संकुलासाठी सिंहाचा वाटा उचलणारे श्री.चतुरभाई ठुमेर म्हणाले की, त्याकाळी आम्हा सर्व देणगीदारांना अल्पशा योगदानासाठी आवाहन करावे लागे, आज ते असे नाव बनले आहे की पायजे जेवढे सहकार्य मिळत आहे.
संस्थापक विश्वस्त श्री. मोहनभाई ठक्कर म्हणाले की या सोसायटीची स्थापना अतिशय कठीण वातावरणात झाली परंतु त्यानंतरच्या सर्व समित्यांनी खूप चांगले काम करून खूप नावलौकिक मिळवला, ज्यांनी आम्हाला साथ दिली त्या सर्व समाजातील लोकांचे मी आभार मानतो.
गुजरात राज्याचे आमदार जयेश भाई रादिया म्हणाले की आज या इमारतीची भव्यता पाहून अपार आनंद होतो.
गुजरात राज्य भाजपचे लोकप्रिय नेते श्री जनक भाई पटेल म्हणाले की गुजराती लोक जिथे जातात तिथे गुजरातचा सुगंध पसरवण्याचे सुंदर उदाहरण म्हणून मी येथे पाहतोय.
श्री विनोद भाई त्रिवेदी, समिती 1999 चे उपप्रमुख म्हणाले की, त्यावेळी आपण सर्वांनी आपली इतर सर्व कामे बाजूला ठेवून केवळ या इमारतीची उभारणी करण्यावर लक्ष केंद्रित केले होते, आज आपण हा टप्पा गाठला याचा मला अत्यंत आनंद होत आहे.
Comments
Post a Comment