आवाज कोकणचा / पनवेल
अशोक म्हात्रे
दिनांक 23 ऑक्टोबर 23
पत्रकार उत्कर्ष समितीने केला दुर्गाशक्ती
चा सन्मान ...
पत्रकार उत्कर्ष समितीचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या अभिनव संकल्पनेतून नवरात्रोत्सवाचे औचित्य साधत समाजातील दुर्गास्वरूप असणाऱ्या विविध क्षेत्रांतील महिलांचा दुर्गाशक्ती पुरस्कार प्रदान करून गौरव केला.
पनवेल येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन येथे झालेल्या या सोहळ्यात पोलीस खाते, वाहतूक शाखा, पत्रकार, डॉक्टर, समाज सेविका, वकील, स्वच्छ्ता कामगार, परिचारिका व कलाकार अशा विविध क्षेत्रांतील दुर्गांचा सन्मान करण्यात आला.
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या अध्यक्षा डॉ. स्मिता पाटील यांच्यासह कार्याध्यक्ष श्रुती उरणकर , उपाध्यक्ष आरती पाटील, सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे , नवी मुंबई अध्यक्ष वर्षा लोकरे, मुंबई उपाध्यक्षा सोनाली मेमाणे, उलवे नोड सचिव प्रमिला सातपुते, सुगंधा म्हात्रे यांच्या हस्त्ते दीप प्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची कलाकार सिद्धी कामथ , धडाडीच्या पत्रकार दिपाली पारसकर, अजित दादा फाउंडेशनच्या अध्यक्षा माया सिरसाट, यांच्यासह पनवेल शहर, वाहतूक शाखा व ग्रामीण पोलीस ठाण्यातील महिला भगिनींना सन्मानीत करण्यात आले.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पत्रकार उत्कर्ष समितीचे सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सदस्य ज्ञानेश्र्वर कोळी , रोहिदास जाधव,
संघटक डॉन एन के के, कोकण अध्यक्ष गोविंद जोशी,कार्याध्यक्ष अलंकार भोईर, रायगड जिल्हा अध्यक्ष सुनील भोईर , कोकण सहसचिव एकनाथ सांगळे , पनवेल तालुका अध्यक्ष अशोक घरत यांनी मेहनत घेतली .
वरीष्ठ पत्रकार किरण बाथम यांची विशेष उपस्थिती होती.
Comments
Post a Comment