आवाज कोकणचा / नवी मुंबई

अशोक म्हात्रे

कोळखे दिनांक १४ ऑक्टोबर २३


  सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूलमध्ये 'जागतिक हात धुणे दिवस' आणि 'मोफत वैद्यकीय शिबिर' संपन्न 

पत्रकार उत्कर्ष समिती, जगदंब ग्रुप सामजिक संस्था व आधार हॉस्पीटल पनवेल यांच्या सहकार्याने सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल कोळखे पनवेल येथे ग्लोबल हॅन्ड वॉश डे ,


( 'जागतिक हात धुणे दिवस )' व मोफत विद्यार्थ्यां आणि पालकांची आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 

शाळेचे फादर संकेत मशिह यांनी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात केली. 

पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी स्वच्छतेचे महत्व तसेच 'जागतिक हात धुणे दिवस' या विषयी उपस्थित पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि केवळ हा दिवस एका दिवसासाठी न पाळता आयुष्यभर पाळण्याचे आवाहन केले. 

 या कार्यक्रमांनंतर आधार हॉस्पिटल पनवेल व जगदंब ग्रुप सामाजिक संस्था आणि पत्रकार उत्कर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे 300 विद्यार्थ्यांनी उपचार घेतले. 



आधार रुग्णालयातील डॉक्टर इशिका गुप्ता, परिचारिका जान्हवी पवार , रुचिता तांबे , पी.आर.ओ. धीरज गायकवाड, जगदंब ग्रुप सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दिपक भोपी , पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र सचिव डॉ. वैभव पाटील, डॉ. अशोक म्हात्रे  यांचा सहभाग होता.

 सेंट जोहान्स इंटरनॅशनल स्कूल पनवेल तर्फे फादर संकेत मसिह (शाळा व्यवस्थापक) सौ. सुसन थॉमस (मुख्याध्यापिका), रवि पॉल (प्रशासन कर्मचारी), महेश राऊत (प्रशासन कर्मचारी), बिजू वर्घीस (शाळा पी.आर.ओ.), फादर टिमोथी यांच्यामुळे कार्यक्रमाचे यश शक्य झाले. 



Comments

Popular posts from this blog