आवाज कोकणचा / प्रतिनीधी
पेण गडब परिसरातील शेतकऱ्यांची तलाठी शोधण्यासाठी वणवण...
पेण, अरूण चवरकर
पेण तालुक्यातील काराव,खारघाट, खारमाचेला, खारजांभेला, खारढोंबी, खार चिर्बी,खारकारावी,खारदेवळी,केळंबी, डोळवी, वडखळ, कोळवे, वावे, कोलेटी या चौदा गावांसाठी एक तलाठी पंकज डोंगरे शासनाने नेमला आहे परंतु तलाठी दर्जाचा हा अधिकारी या चौदा गावात बसत नसुन ते वाशिनाका येथे बसत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना या अधिकाऱ्याला शोधण्यासाठी शोधात खिशातील स्वतः पदरमोड करून वाशिनाका येथे जावे लागते आणि नाही भेटले तर पैसे व वेळ वाया जातो .
या बाबतची तक्रारवजा व्यथा पत्रकार अरुण चवरकर, कमलेश ठाकूर यांना अनेक शेतकरी व ग्रामस्थानी केल्यानंतर चवरकर यांनी तलाठी डोंगरे याची भेट घेतली आणि त्यांना चौदा गावांच्या मध्यवर्ती ठिकाणी बसण्याची विनंती केली .
त्याप्रमाणे चर्चा होऊन वडखळ नाका येथे बसावे असे सुचवले तर वडखळ तलाठी ऑफिस मध्ये साप निघतात तसेच डोळवी येथील तलाठी कार्यालय मोडकळीस आले असल्यामुळे तिथे बसने शक्य नाही असे सांगीतले.
शेवटी गडब येथे बसा सांगितले व त्यास सकारात्मक प्रतिसाद देत तलाठी पंकज डोंगरे यांनी सध्या निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्यामुळे अरूण चवरकर आणि कमलेश ठाकूर यांना निवडणूक झाल्यानंतर गडब गावासाठी आठवड्यातील एक दिवस देण्याचे आश्वासन दिले आहे.
Comments
Post a Comment