आवाज कोकणचा / प्रतिनीधी
उरण ( पूजा चव्हाण)
उरण मधील भंगाराच्या गोदामाला भीषण आग ....आगीत कोणती वित्तहानी नाही ...पण आगीचे कारण अद्याप गुलदस्त्यात...
उरण बोरी येथील रमजानच्या भंगाराच्या गोदामाला काल दिनांक २७/१०/ २००३ रोजी सकाळी १०.३० त्याच्या सुमारास भीषण आग लागली ही आग एवढी मोठी होती या आगीच्या ज्वाला खूप उंचावर दिसत होत्या त्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या गोदामा मध्ये कित्येक वर्षापासून लाकडी पॅलेट, जुनी लाकडे, प्लास्टिक पॅलेट, प्लास्टिक बाटल्या, डबे, व इतर भंगारचा धंदा या गोदामध्ये सुरू होता.
गोदामाला आग लागली कळतात अग्निशामक दलाच्या दहा गाड्या त्वरित घटनास्थळी येऊन त्यांनी तसेच जनतेने, व शासकीय यंत्राच्या मदतीने ही तीन ते चार तासात ही भीषण आग आटोक्यात आणली.यावेळी ओ,एन,जी,सी, अग्निशामक दल सिडको अग्निशामक दल, एन,ये,डी अग्निशामक दल, व एम,येस, सी, बी,अग्निशामक दल यांनी आटोक्यात प्रयत्न केल्यानंतर ही भीषण आग आटोक्यात आली.आगेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झालेली नसली तरी यात मोठ्या प्रमाणात गोदामातील मालमत्तेचा नुकसान झालेला आहे. जरी आग आटोक्यात आणलेली असली, तरी ही आग १२ तासाच्या नंतर देखील पूर्णपणे आध्याप विझलेली नाही. त्यामुळे ही एवढी भीषण आग का लागली असावी असा प्रश्न नागरिकांच्या मनात पडत आहे.तसेच याचे कारण अजून गुलदस्तात आहे.
Comments
Post a Comment