आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे / दिनांक 8 ऑक्टोबर 23
छत्रपती शिवाजी महाराज डिझाईन अँड आर्ट महाविद्यालयात फॅब्रिक पेन्टिंग कार्यशाळेचे आयोजन
पनवेल, शेडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज युनिव्हर्सिटी संचालित सी एस एम स्कूल ऑफ डिझाईन अँड आर्ट महाविद्यालयात दि. 31 ऑक्टोबर रोजी फॅब्रिक पेन्टिंग कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
या कार्यशाळेचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांना व्यक्तिगत प्रशिक्षण देणे, त्यांच्या कलागुणांना वाव देणे आणि केलेबद्दल जिज्ञासा वाढवणे हे होते. या कार्यशाळेचे उदघाटन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफ. डॉ. के. अल. वर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
या यशस्वी कार्यशाळेचे नेतृत्व आणि मार्गदर्शन सौ. माधवी पटवर्धन यांनी केले. त्या पेडिलाइट कंपनीशी संलग्न असून त्यांना 30 वर्षाचा अनुभव आहे. या कार्यशाळेत त्यांनी फॅब्रिक पैंटिंग च्या विविध पद्धती, मुक्तहस्तकला, स्टेनसिलिंग अशा अनेक पद्धतीची शिकवण देताना विविध वस्तूंचा, रंगाचा आणि साहित्याचा वापर करण्यात आला. यात महाविद्यालयातील विविध विभागातील सुमारे 35हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी काढलेल्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या कार्यशाळेत युनिव्हर्सिटीचे कुलगुरू प्रोफ. डॉ. के. अल. वर्मा, निबंधक प्रोफ. डॉ. आर पी शर्मा, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. प्रीती बन्सल, सौ. माधवी पटवर्धन आदी मान्यवर उपस्थित होते.
Comments
Post a Comment