आवाज कोकणचा / प्रतिनीधी
अशोक म्हात्रे
उल्हासनगर महापालिका आयुक्त डॉ गणेश शिंदे यांच्या निलंबनासाठी आदिवासी बांधवांचा मोर्चा
उल्हासनगर महापालिका कार्यक्षेत्रातील
वडिलोपार्जित आदिवासी बांधवांचे वास्तव्य असलेल्या जमिनीवर पालिकेने बुलडोजर चालवल्याने येथिल आदिवासी बांधव संतप्त झाले असुन आदिवासी आदिम कातकरी संघटनेचे अध्यक्ष गुरुनाथ लखमा वाघे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेवर मोर्चा काढला होता .
या मोर्चामध्ये आयुक्त गणेश शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे.
तीन पिढ्यांहून अधिक वास्तव्य असलेल्या या भागात जवळपास शंभर आदिवासी कुटुंबांचे वास्तव्य आहे.
काळानुरूप बदलत्या सामजिक व्यवस्थेनुसार
या आदिवासी बांधवांनी उदरनिर्वाह चालवण्यासाठी आपल्या जागेत काही व्यवसाय सुरू केला परंतु महानगरपालिकेने त्यांचे हे व्यवसाय बुलडोझरच्या सहाय्याने उध्वस्त केले .
येथिल स्थानिक राजकारणी आणि पालिका अधिकाऱ्यांनी हातमिळवणी करून गुंडगिरी करत आमचे व्यवसाय उध्वस्त केल्याने आमची आर्थिक कोंडी करण्याचे काम पालिका अधिकरी करत असल्याचा आरोप आदिवासी बांधवांनी केले आहेत .
तसेच याच जागेत पालिकेकडून पाण्याच्या टाकीचे बांधकाम होणार असल्याने दुकानात तोडण्यात आली अशी माहिती दिली आहे
यामुळे संतप्त झालेल्या आदिवासी बांधवांनी पालिकेवर महिला पुरुषांसह मोठ्या संख्येने धडक मोर्चा काढून अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन दिले. तसेच सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी आणि मुकादम श्याम सिंग यांच्यावर गुन्हा दाखल करून निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तसेच या बाबत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास पालिकेसमोर उपोषण करणार असल्याचे म्हटले आहे.
Comments
Post a Comment