आवाज कोकणचा / नवी मुंबई
शैलेश ठाकुर
दिनांक : २३ नोव्हेंबर २३
आय.ओ.टी. एल. कंपनी विरुद्ध धुतूम ग्रामस्थ आक्रमक आमरण उपोषण सुरू
दिनांक 20 नोव्हेंबर 23 पासून उरण तालुक्यातील धुतुम गावचे ग्रामस्थ आय. ओ. टी. एल या तेल साठवण कंपनीच्या कंपनीच्या विरोधात आमरण उपोषणास बसले आहेत. सुमारे 22 ते 25 वर्षापासून धुतुम गावाच्या हद्दीमध्ये या कंपनीने आपले काम चालू केले होते.
सुरुवातीला या कंपनीने येथे सात टॅंक उभारले तेव्हा येथिल स्थानिक ग्रामस्थांना कामावर घेण्याचे आश्वासन दिले होते व त्या नुसार 24 कामगार भरती केले होते.
त्या नंतर कंपनीचा विस्तार होऊन जवळजवळ बावीस ते पंचवीस टॅंक कंपनीमध्ये उभारले असून प्रकल्पबाधित एकही कामगार त्याच्यामध्ये भरती केलेला नाही. ग्रामपंचायतीने वारंवार अर्ज देऊन चर्चा केली परंतु त्यांच्या अर्जाची कोणत्याही प्रकारची दखल आतापर्यंत घेतलेली नाही.
शासन आदेशानुसार प्रकल्पबाधित व्यक्तीस कामावर घेणे बंधन कारक असताना येथे बाहेरील लोकांना नोकरी देण्यात आली आहे .
याविषयी कंपनी प्रशासनाकडे विचारणा केली असता कंपनी प्रशासन उत्तर देत नाही. या प्रकल्पासाठी जवळजवळ 83 कुटुंबाच्या जमिनी संपादित करण्यात आल्या परंतु त्यापैकी केवळ 24 लोकांनाच नोकरीत सामावून घेण्यात आले.
उर्वरित प्रकल्प बाधितांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी गावच्या सरपंच सरपंच सुचिता प्रेमनाथ ठाकूर यांच्यासह उपसरपंच व सदस्य तसेच स्थानिक प्रकल्पग्रस्त एकत्र येऊन कंपनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू केले आहे. परंतु तीन दिवस उलटल्यानंतरहि कंपनी प्रशासन किंवा शासकीय स्तरावर याची दखल घेतली नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रमक झाले असून प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
Comments
Post a Comment