आवाज कोकणचा / मुंबई

विश्वनाथ तळेकर म

पत्रकार उत्कर्ष समिती मुंबई अध्यक्ष समाजसेवक श्री.राजेंद्र लकेश्रीना सरदार पटेल राष्ट्ररत्न पुरस्काराने सन्मानित



*===========================*


मानवसेवा डॉ.मणिभाई देसाई ट्रस्ट, एनवाएके क्रिडा मंत्रालय, भारत सरकार व निती आयोग संलग्नित दिल्ली आय.एस.ओ. नामांकित व डॉ. रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंद्रांच्या वतीने पत्रकार उत्कर्ष समिती मुंबईचे अध्यक्ष व ज्येष्ठ समाजसेवक श्री. राजेंद्र लकेश्री यांना 


त्यांच्या ५० व्या वर्षाच्या रचनात्मक आदर्श कार्याच्या गौरव पित्यर्थ राष्ट्रीय पातळीवरचा अत्यंत नामांकित २०२३ चा भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्ररत्न पुरस्कार समाजसेवक किर्तनकार व संस्थेचे अध्यक्ष डॉ.रविंद्र भोळे यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांस्कृतीक भवनात देण्यात आला.

श्री.राजेंद्र लकेश्री यांच्या ५० वर्षांच्या सामाजिक सेवेच्या कारकिर्दी मध्ये महाराष्ट्र राज्य सरकारने शिवछत्रपती राज्य युवा संघटक पुरस्कार,तर महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा एकमेव, कामगार भूषण राज्य पुरस्कार, गुणवंत कामगार राज्य पुरस्कार सह मुंबईचे महापौर,पोलीस, आयुक्त्तासह महाराष्ट्र,गोवा, दिल्लीतील १५० मान्यवर संस्थानी १५० पुरस्कार देवून गौरव केला आहे पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.अशोक म्हात्रे व मुंबईचे सरचिटणीस आनंद मुसळे व बाबी तळेकर सह अनेक मान्यवरांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला

.


Comments

Popular posts from this blog