आवाज कोकणचा / नवी मुंबई

डॉ. वैभव पाटील 

पत्रकार उत्कर्ष समितीतर्फे हार्ट अटॅक विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिर संपन्न....


पत्रकार उत्कर्ष समिती तर्फे श्री छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय गव्हाण येथे हार्ट अटॅक या विषयावर मार्गदर्शन व प्रात्यक्षिक शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . 



            कार्यक्रमाची सुरुवात शाळेचे प्राचार्य श्री गोडगे यांनी समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे व  सचिव डॉ. वैभव पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करून व महिला उत्कर्ष समितीच्या सदस्या जयश्री चव्हाण यांना शिक्षिका सौ .ठाकूर जे इ. यांनी शाल व पुष्पगुच्छ देवून त्याचे स्वागत करून झाली. 


त्यानंतर  समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांनी हार्ट अटॅक विषयी माहिती विशद करून हार्ट अटॅक येण्याची  कारणे व जेव्हा येतो तेव्हा दिसणारी व जाणवणारी लक्षणे, तसेच हृदय मजबूत व  निरोगी राहून हार्ट अटॅक येऊ  नये यासाठी घ्यायची काळजी याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.


त्यानंतर जयश्री चव्हाण यांनी हार्ट अटॅक येतो त्यावेळी प्रत्यक्षात दिसणारी लक्षणे व तशी परिस्थिती उद्भवल्यास त्यावेळी करावा लागणारा प्रथमोपचार सि. पी. आर . ( C.P.R. - Cardio Pulmonary Resuscitation )  याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. 


या कार्यक्रमासाठी रयत शिक्षण संस्थेचे लाईफ मेंबर श्री. रविंद्र भोईर ,  उपमुख्याध्यापक श्री .मंडले,  ज्युनिअर कॉलेज विभाग प्रमुख पाटोळे , श्री पाटील यु डी, श्री घरत एम के, श्री चौधरी आर. एन.,  श्री खेडकर आर. ए. यांनी मोलाची भूमिका बजावली. 

यावेळी खुशी गुप्ता या विद्यार्थिनीने प्रात्यक्षिकामध्ये सहभाग घेत आपली चुणूक दाखवली.




Comments

Popular Posts