आवाज कोकणचा / नवी मुंबई
प्रतिनिधी
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या मागणीला यश...
खारकोपर रेल्वे स्टेशन ते सेक्टर दहा बी शिवाजीनगर पोलीस चौकी या अंतरात स्ट्रीट लाईट नसल्यामुळे महिला भगिनींना रात्रीच्या वेळी आपला जीव मुठीत घेऊन अंधारातून चालत जावे लागत होते यासाठी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उत्कर्ष समितीने सिडको अधिकाऱ्यांकडे मागणी करून तातडीने हे पदपथ दिवे बसवायला लावले .
यामध्ये महिला उत्कर्ष समिती नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे, पुनम यादव, प्रमिला सातपुते, प्रदेश सचिव ॲडवोकेट दिव्या लोकरे, मिरा जाधव यांच्यासह त्यांच्या सहकारी उपस्थित होत्या.
उलवे नोड वसाहतीत काही अडचणी, समस्या व तक्रारी असल्यास समितीला संपर्क साधावा असे आवाहन करण्यात येत आहे.
संपर्क क्रमांक :
7977996992
Comments
Post a Comment