आवाज कोकणचा/ नवी मुंबई

प्रतिनीधी  दिनांक : 24 डिसेंबर 23

महिला उत्कर्ष समितीचा आगळा वेगळा उपक्रम एक भरारी प्रगतीसाठी.....



पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या उलवे विभागातर्फे भावी  उलवे अध्यक्षा व हिरकणी महिला मंडळाच्या प्रमुख  पुनम यादव यांच्या नेतृत्वाखाली व  नवी मुंबई उपाध्यक्षा वर्षा लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली उलवे विभागातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी गृह उद्योगाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.


 
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
श्री बबन यादव यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यशाळेला  सुरुवात केली.


 
या वेळी वेगेवेगळ्या गृह उत्पादनाची माहिती आपापसात उपस्थित भगिनीनी  दिली. तसेच या उत्पादनांना बाजारपेठ मिळवणे व  आर्थिक सक्षमीकरणासाठी सहकार्य करणे याबाबत चर्चा करून लवकरच त्यावर प्रत्यक्ष काम सुरू करण्याचे ठरले.


 
या कार्यशाळेसाठी  शीतल कंठे , प्रमिला सातपुते, सिमा बोकडे, सुप्रिया खोत, वैशाली गायकवाड , हिना भानुशाली, प्रिया गायकवाड, अर्चना गायकवाड, मिरा जाधव, प्रियांका शिंदे, संगीता गाडे इत्यादी महिला भगिनींनी उस्फुर्त सहभाग नोंदवला







🟪🟫🟧🟨🟦🟩🟥🟪🟫🟧🟨🟦🟩🟥



.

Comments

Popular posts from this blog