आवाज कोकणचा / मुंबई

प्रतिनिधी



 ओ एन जी सी च्या एम, ओ, यू,व कंत्राटी कामगारांचा श्रमरक्षा भवन सायन मुंबई आवारात आंदोलन सुरू

ओ. एन. जी. सी. मुंबई, पनवेल, उरण येथे गेले तीस वर्षां पासून काम करणारे कामगार सिक्युरिटी,हाऊस किपींग, गार्डन, मेंटेनन्स, इलेक्ट्रिक,वाटर सप्लाय अशा विविध पदांवर काम करणाऱ्या कामगारांन वर अन्याय होत आहे म्हणून ऑइल फिल्ड असोशियन युनियनचे अध्यक्ष शाळिग्राम मिश्रा यांनी सुप्रीम कोर्ट दिल्ली, हायकोर्ट मुंबई येथे M,O,U कामगारांच्या रिड पीटेशन दाखल करून कामगारांना एम ओ यू मिळावा यासाठी वकील न करता स्वता केसेस जिंकलेल्या असुन एम, ओ, यू फिक्स करण्यासाठी श्रमरक्षा भवन सायन मुंबई यांना वर्ग केलेल्या आहेत परंतु गेल्या अडीच वर्षांपासून श्रमरक्षा भवन सायन येथे चक्कर मारून वैतागले केव्हा जज बसत नाहीत आणि बसले तर तारीख पे तारीख यामुळे शाळिग्राम मिश्रा व ओ एन जी सी एम ओ यू कामगार वैतागून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आपल्या ला न्याय मिळत नाही,



कायदा सुव्यवस्था आहे का आणि सनदशीर मार्गाने न्याय मिळत नाही,ह्या कामगारांना अजून बोनस सुध्दा दिला नाही कामगारांना वेठीस धरले आहे व श्रमरक्षा भवन सायन मुंबई यांच्या कडून न्याय मिळत नाही हि नाराजी व्यक्त करण्यासाठी त्यांच्या आवारात २५/१२/२०२३ पासून धरणे आंदोलन सुरू केले आहे जर पाच दिवसात निर्णय झाला नाही तर आंदोलन चिघळले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही असे मत शाळि येतेग्राम मिश्रा यांनी सांगितले आहे.





Comments

Popular posts from this blog