आवाज कोकणचा / नवी मुंबई
महिला उत्कर्ष समिती उलवे नोड नविन कार्यकारीणी लवकरच जाहीर.....
पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या प्रस्तावित नविन उलवे कार्यकारिणीची बैठक आज पार पडली.
या बैठकीमध्ये निर्णय होऊन या अगोदर अस्तित्वात असलेली कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली असून लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे अध्यक्ष डॉक्टर अशोक मात्रे यांनी सांगितले.
नवी मुंबई उपाध्यक्ष वर्षा लोकरे यांच्यासह पूनम यादव कल्पना सैदाने हिना भानुषाली शितल कंटे राधा गोरीवले प्रियंका शिंदे आणि प्रिया गायकवाड या महिला सदस्य उपस्थित होत्या.
या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली ज्यात प्रामुख्याने महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्याकरिता काही व्यवसायांची माहिती उपस्थित सदस्यांना दिली.
ही बैठक खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली असून लवकरच नवीन कार्यकारिणी जाहीर होणार आहे.
Comments
Post a Comment