काऊन सिजर मेटी यांची जयंती पनवेल येथे उत्साहात साजरी ......
इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्राच्या वतीने पनवेल येथील शासकीय विश्रामगृहात पाचवी विकसनशील चिकित्सा पद्ती इलेक्ट्रो होमिओपॅथीचे जनक डॉ.काउंट सिजर मेटी यांच्या जयंतीनिमित्त एका छोटेखानी समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज व इलेक्ट्रो होमिओपॅथीचे जनक डॉ. काऊन सिजर मेटी यांना पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली .
या कार्यक्रमासाठी पनवेल येथील चिकित्सक बंधू भगिनी उपस्थित होते.
डॉ. वैभव पाटील, डॉ. मनोज मयेकर डॉ. अनारूल इस्लाम , डॉ. सुनिल मुंबईकर, डॉ. सुधिर केनी,डॉ. सुधीर विश्वकर्मा व सुरेखा पाटील यांच्यासह इतर चिकित्सक बंधू भगिनी उपस्थित होते.
Comments
Post a Comment