आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे
आमचा कोळीवाडा अप्रतिम नाटक रसिकांच्या मनोरंजनासाठी दाखल....
दत्ता भोईर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आमचा कोळीवाडा हे नाटक शनिवार दिनांक 13 जानेवारी 24 रोजी आद्यक्रांतीविर वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहातून प्रथम प्रयोगाने नाट्यरसिकांच्या मनोरंजनासाठी दाखल झाले आहे.
या नाटकाची मांडणी करताना दत्ता भोईर यांनी आगरी कोळी समाजातील रुढी परंपरा व बोलीभाषा यांची योग्य सांगड घातली असून प्रेक्षकांच्या पसंतीस येयील अशी मांडणी आहे.
कालानुरूप बदलती जीवनशैली, इतर भाषांचा वाढत चलेलेला प्रभाव यामुळे पारंपरिक वेशभूषा, बोलीभाषा व व्यवसाय यावर परिणाम होऊन या सर्वच गोष्टी नामशेष होतील की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
हाच धागा पकडून दत्ता भोईर यांनी या सर्वच गोष्टी पुढील पिढीपर्यंत पोचण्यासाठी आधुनिक विज्ञानासोबत सांगड घालून हा नाट्य संच निर्माण केला आहे.
या कार्यक्रमासाठी आगरी कोळी समाजातील नामदेव भगत , जयेंद्र खुणे, रामदास संधे, जस्टिस चंद्रलाल मेश्राम, डॉ. अशोक म्हात्रे , ॲड. चंद्रकांत मढवी, अक्षता म्हात्रे, जया दळवी, नामदेव पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
हे नाटक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला असून शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment