राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत मोफत वैद्यकीय तपासणीच्या आयोजन.

 राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत मोफत वैद्यकीय तपासणीच्या आयोजन.

आवाज कोकणचा/पूजा चव्हाण 

              राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अभियान हे १५ जानेवारी ते १४ फेब्रुवारी पर्यंत अभियान राबवण्यात येणार आहे.या अभियानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे वाहतुकीचे नियम, लघुचित्रपट, वैद्यकीय तपासण्या, अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजन करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येणार आहे.

          या अभियानांतर्गत उरण वाहतूक शाखेमार्फत १७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता उरण मधील अल्ट्राटेक कंपनी येथे हा वैद्यकीय कॅम्प भरवण्यात आला होता.हा कार्यक्रम नवी मुंबई वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त माननीय काकडे साहेब यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रीय सुरक्षा रस्ता अंतर्गत येथे वैद्यकीय तपासणीचा कॅम्प ठेवण्यात आला होता.

        या कॅम्पमध्ये नेत्र तपासणी,उच्च रक्तदाब, दंतचिकित्सा, मधुमेह, तपासणी अशा प्रकारच्या विविध तपासण्या यामध्ये घेण्यात आल्या होत्या.या वैद्यकीय तपासणी मध्ये एकूण २२८ वाहतूक चालकांनी याचा लाभ घेतला. या वैद्यकीय तपासणी कॅम्प चे उद्घाटन उरण वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते. तसेच यावेळी पोलीस हवालदार अमोल बुधनवार , इत्यादी पोलिस हवालदार यावेळी उपस्थित होते. तसेच हा वैद्यकीय तपासणी कॅम्प नवी मुंबई येथील हेल्थ स्प्रिंग संस्थेमार्फत घेण्यात आला होता.

Comments

Popular posts from this blog