आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग
अशोक म्हात्रे
महिला उत्कर्ष समिती कोकण अध्यक्षा ज्योतीका हरयान यांनी सहकाऱ्यांसह केला बालिका दिन साजरा..
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कोकण विभागीय अध्यक्ष ज्योतीका हरयाण यांच्यासह जिल्हा सदस्या स्वरदा खांडेकर व ईतर सहकाऱ्यांनी समाजाप्रती महिला उत्कर्ष समितीचे योगदान अधोरेखित करीत मारुती विद्या मंदिर जानवली येथील अंगणवाडीला भेट देऊन तेथील मुलींसोबत बालिका दिन साजरा केला.
येथील अंगणवाडी सेविका माधुरी लाड यांच्याशी संवाद साधून तेथील कन्या विषयी माहिती करून घेतली. सर्व मुलांकडून स्वागत करण्यात आले.
आजच्या या दिनाचे महत्व साधत उपस्थित सर्व मुलांना बिस्कीट पुड्याचे वाटप करण्यात येऊन त्यांना गोड शुभेच्छा देण्यात आल्या .
मुलींनी गोड गाणी गाऊन दाखवली तसेच छान छान गोष्टी सांगितल्या. त्यांचे बालिश हाव भाव बघण्यासारखे होते. सर्व वातावरण आनंदीत होते.त्यावेळी उपस्थित जिल्हा सदस्य स्वरदा खांडेकर तसेच पालक वर्ग उपस्थित होता.अशाप्रकारे राष्ट्रीय बालिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
Comments
Post a Comment