कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय पिरकोण येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर संपन्न
विद्यार्थ्यांना प्रगत तंत्रज्ञानाबरोबरच समाजातील विविध घटनांची माहिती मिळावी तसेच उत्तम आरोग्य रहावे यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रत्येक विद्यालयात करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत.
त्या आदेशास अनुसरून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय त्रिकोण उरण येथे विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरासाठी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यानी विद्यार्थ्यांना संसर्गजन्य आजार, डोळ्यांचे आजार, मधुमेह, हृदयरोग यासारखे रोग व प्राथमिक उपचार याविषयी सखोल माहिती दिली.
तसेच प्रगत तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालेली असल्यामुळे त्या विषयाची माहिती सुद्धा डॉ. म्हात्रे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना दिली
ज्यामध्ये इंटरनेटचा वापर करत असताना घ्यावयाची काळजी व अशा प्रकारचा गुन्हा घडल्यास त्याबाबत तक्रार कुठे करावी याचीही माहिती देण्यात आली . कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचालन सौ . सी. आर. घरत यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी श्री. रुपेश कोळी यानी विशेष मेहनत घेतली.
या कार्यक्रमासाठी शाळेच्या प्राचार्या सौ बल्लाळ , गुरुकुल प्रकल्प प्रमुख म्हात्रे एस .आर. , सौ .ए. ए . पाटील सौ एम. एस पाटील, सौ चौधरी , सौ डी. आर. पाटील, श्री डाढाले, श्रीमती कल्याणकर, उपस्थित होत्या.
Comments
Post a Comment