आवाज कोकणचा / प्रतिनीधी
नवी मुंबई.
महिला उत्कर्ष समितीतर्फे आरोग्य तपासणी, मार्गदर्शन व हळदीकुंकू समारंभ संपन्न
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई अध्यक्ष सौ सुजाता दिनेश कडू यांनी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला उत्कर्ष समितीच्या सदस्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी मार्गदर्शन शिबिर व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन केले होते.
आयएमसी या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कंपनीच्या प्रतिनिधी सौ आशा चव्हाण , सौ सपना जोशी व आकाश यांनी उपस्थित महिलांना आरोग्यविषयक माहिती दिली व आपण आजारी होऊच नये यासाठी घ्यावयाची काळजी याचेही मार्गदर्शन केले .
या कार्यक्रमासाठी महिला उत्कर्ष समितीच्या नवी मुंबई सदस्य सौ श्वेता तांडेल, सौ . सोनिया कडू, सौ. हेमा कडु , सौ आरती कडू, सौ. नयना तांडेल यांच्यासह असंख्य महिला उपस्थित होत्या .
हळदीकुंकू समारंभाच्या निमित्ताने उपस्थित महिलांना सुजाता कडू यांनी भेटवस्तू देत सलोख्याचे संबंध निर्माण करण्याचे आवाहन केले तसेच महिला उत्कर्ष समिती सोबत अधिकाधिक महिलांनी यावे यासाठी आवाहन केले त्यांच्या या कार्याचे समाजातील विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment