आवाज कोकणचा / नवी मुंबई :

प्रतिनीधी 

शौर्य मार्शल आर्ट्सच्या वतीने वडखल येथे दुसऱ्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेचे आयोजन 



शौर्य मार्शल आर्ट्स यांच्या वतीने दिनांक ७ जानेवारी रविवार रोजी वडखल येथे दुसरी राज्यस्तरीय कराटे (काता,कु्मिते) स्पर्धेचे आयोजन योगेश पाटील सरांच्या माध्यमातून  केले होते. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामपंचायत सरपंच व सदस्य, विजय विकास सामाजिक संस्था यांचे पदाधिकारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील पाहुण्यांची प्रमुख उपस्थित होती. या स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पनवेल, उरण,  पेण,अलिबाग, कर्जत खालापूर, महाड, माणगाव या तालुक्या मधील साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.  पनवेल मधून शैलेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली इंडियन मार्शल आर्ट्स शितो-रियो फेडरेशनच्या विद्यार्थ्यांनी नवीन वर्ष २०२४ ची सुरुवात चमकदार कामगिरी करत (१९ सुवर्ण पदक,)(१३ रौप्य पदक)(३६ कांस्य पदक) असे ६८ मेडल्सची कमाई करत द्वितीय क्रमांकाची चॅम्पियनशिप ट्रॉफी, व सायकल चे मानकरी ठरले. या स्पर्धेसाठी अभिषेक सिंग,सानिका ठाकूर, 



भूमीजा पांडे, दिव्या पाटील,रिताशा सुर्वे, पियुष धायगुडे, आकांक्षा ठोकळे, शौनक करंदीकर, हर्षद पाटील, श्रेया सोनवले, अनघा नलावडे, साहिल खान, सोहेल खान, यांनी पंचांची कामगिरी केली. ब्लॅक बेल्ट विजेता म्हणून दिव्या पाटील व आकांक्षा ठोकळे यांना मेडल्स व एअर कुलर देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या स्पर्धेमधील ज्युनिअर कॅटेगिरी मध्ये भावेश सद्गुरु पाटील या विद्यार्थ्याला बेस्ट फायटर म्हणून ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.तसेच  या स्पर्धेसाठी ईश्वरी खिलारे, श्रेयस यादव, अमेय गायकवाड, आयुष झोरे धनश्री डाखोरे, आलिया वर्मा,आयुष खिल्लारे, प्रेम चव्हाण, श्रेयश पुकले, रुद्र पाटील,भावेश पाटील, सोनाली केवट, प्रियांका रस्कोती, सृष्टी ठाकूर, हेतल भोईर, नितीन चव्हाण, आनंद चव्हाण, श्रेया पुकले, अक्षरा जाधव, देवराज जाधव, क्षितिज कदम, प्रभगुन उप्पल, अन्वित चव्हाण, अविर कंबोज, भार्गव करंदीकर, प्रियांशु भोरकडे, विजय मेटकरी, सर्वेश म्हात्रे, अनुज वाफारे, जिया पाटील, सात्विक पालवे या सर्वांनी स्पर्धेसाठी सहभाग घेतला होता. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे पत्रकार उत्कर्ष समिती व उत्कर्ष न्यूज चे अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, आवाज कोकणचा चे संपादक डॉ. वैभव पाटील, रायगड दर्पण चे संपादक सुनील भोईर  यांच्याकडून सर्व मुलांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.














Comments

Popular posts from this blog