आवाज कोकणचा / नवी मुंबई

हेमंत कोळी 

केंद्र सरकारकडून २२ जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर



    केंद्र सरकारने अयोध्येतील राम मंदिरात २२ जानेवारीला होत असलेल्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने ही ऑर्डर काढली आहे. ऑफिस मेमोरँडमनुसार, कर्मचार्‍यांच्या भावना आणि विनंती लक्षात घेऊन, केंद्र सरकारने सर्व केंद्र सरकारी कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक येथे अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे.



   २२ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत आस्थापनेला सुट्टी असेल. देशभरात २२ जानेवारीला दिवाळी साजरी केली जाणार आहे. लोकांमध्ये मोठा उत्साह आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यांनी यानिमित्त आधीच सुट्टी जाहीर केली आहे. आता केंद्र सरकारनेही सर्व कार्यालये आणि संस्थांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. लोकांना प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी ही अर्धा दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

   राम मंदिराच्या उद्घाटनाच्या तयारीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रिमंडळाकडून अभिप्राय घेतला आहे. मंत्र्यांना हा दिवस दिवाळी सारखी साजरी करण्यास सांगितले आहे. या दिवशी घराघरात दिवे लावले जाणार आहेत. गरिबांना अन्नदान करण्याचं आवाहन देखील करण्यात आले आहे. २२ जानेवारीनंतर मतदारसंघातील लोकांना ट्रेनने अयोध्येला पाठवावे, असे देखील म्हटले आहे.

   दरम्यान, अयोध्येत २२ जानेवारीला राम मंदिराचा अभिषेक झाल्यानंतर २३ जानेवारीपासून रामलल्लाचे दर्शन सगळ्यांना घेता येणार आहे. पहिल्याच दिवशी १ लाख लोकं येण्याची शक्यता आहे. मंदिराचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. २२ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या दिवशी काही सेकंदाचा  शुभ मुहूर्त असणार आहे...!





Comments

Popular posts from this blog