पत्रकार उत्कर्ष समितीने पत्रकारांना पुरस्काराने गौरव करून केला पत्रकार दिन साजरा...
पत्रकार उत्कर्ष समितीने पत्रकारांना पुरस्काराने गौरव करून केला पत्रकार दिन साजरा...
पत्रकार उत्कर्ष समिती या राज्यस्तरीय पत्रकारांच्या संघटनेने पनवेल येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहामध्ये तळागाळात काम करणाऱ्या निर्भीड पत्रकारांचा दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर सन्मान पुरस्कार देऊन गौरव केला .
रायगड नवी मुंबई ठाणे व मुंबई या विभागात पत्रकारिते क्षेत्रात अवर्णनीय कार्य करणाऱ्या 51 पत्रकार बंधू भगिनींचा आज सन्मान करण्यात आला .
स्वामी समर्थ परमपूज्य श्री रामदासजी महाराज व पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन करून या कार्यक्रमाला सुरुवात केली.
समाजातील प्रश्नांना वाचा फोडून आपल्या लेखणीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रसंगी जीवाची बाजी लावणाऱ्या लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाचे खांब असलेल्या या रत्नांना दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनी म्हणजेच पत्रकार दिनाचे औचित्य साधत समितीच्या वतीने गौरवण्यात आले .
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सचिव डॉ वैभव पाटील, खजिनदार शैलेश ठाकूर, सहसचिव ज्ञानेश्र्वर कोळी, सदस्य रोहिदास जाधव, रायगड अध्यक्ष सुनील भोईर, नवी मुंबई अध्यक्ष नीलेश उपाध्याय, पनवेल अध्यक्ष अशोक घरत, कोकण कार्याध्यक्ष लालचंद यादव, अरुण चवरकर, गुरुनाथ तिरपणकर, राजू नायक यांच्यासह सर्वांचे मोलाचे योगदान लाभले.
पेण तालुका सदस्य अक्षय पाटील यांनी उत्कृष्ठ सूत्रसंचालन केले तर कोकण अध्यक्ष अलंकार भोईर यानी आपल्या आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले
.
Comments
Post a Comment