आवाज कोकणचा / नवी मुंबई
अशोक म्हात्रे
सरपंच सदाशिव वास्कर यांच्या सहकार्याने कुंडेवहाळ मध्ये आरोग्य शिबिर संपन्न
पनवेल डॉक्टरस जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशन ,शंकरा आय हॉस्पिटल व ग्रुप ग्रामपंचायत कुंडेवहाळ यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हा परिषद शाळा कुंडेवहाळ येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या आरोग्य शिबीरासाठी प्रमुख उपस्थिती माननीय डॉक्टर गिरीश गुणे सर हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.या वेळेस डॉ मिलिंद पराडकर - आधार हॉस्पीटलडॉ पुजा गुप्ता, डॉ.नितिश अरोरा मेडीककर हॉस्पीटल तसेच असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. वैभव मोकल डॉ. संदेश महाडकर डॉ. रवींद्र राऊत यांच्या उपस्थितीत पार पडले.
या शिबिरामध्ये प्रामुख्याने मोफत आरोग्य तपासणी ,नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया ,मोफत औषधे वाटप हाडांची घनता तपासणी, शुगर तपासणी होमिओपॅथी औषध या सर्व गोष्टीचा समाविष्ट करून शिबिर राबवण्यात आला. या शिबिराची यशस्वी रित्या पार पाडले म्हणजे डॉक्टर गुणे सरांनी स्वतः तिथे उपस्थित राहून सर्व पेशंटचे तपासणी करून उपचार केले. यावेळेस शिबिरासाठी प्रामुख्याने पनवेल डॉक्टर जनरल प्रॅक्टिशनर असोसिएशनचे डॉ, सिद्धार्थ डॉ-सागर ठाकूर डा सचिन सेठ डॉ सचिन पाटील डॉ. मेटकर डॉ सोनल सेठ, डॉ श्रेया सेठ् डॉ सुलक्षणा मांडे, डॉ. मंदार कुटे' डॉ मिलिंद जोशी डॉक्टर लोखंडे डॉक्टर सागर चौधरी यांच्या प्रयत्नाने शिबिर व्यवस्थित पार पडले.यावेळेस विविध हॉस्पिटलने सुधा या शिबिरास उपस्थिती दाखवली संजीवनी हॉस्पिटल मेडिकवर हॉस्पिटल अष्टविनायक हॉस्पिटल या डॉ लवटे व सहकारी, नवी मुंबई ब्लड बँक, खारघर. 30 जणांनी रक्तदान केले.
शिबिराचे आयोजन कुंडेवहाल चे संरपंच सदाशिव वास्कर श्री प्रकाश पाटील व सदस्य यांची अथक मेहनत घेतली.६०० रुग्णांवर निदान करून उपचार केले.
Comments
Post a Comment