आवाज कोकणचा / उरण  

प्रतिनिधी -  पूजा चव्हाण 

बोरखर गावात प्रथमच शिवजयंती निमित्त महिला बचत गटाकडून खाद्य महोत्सव साजरा.


रविवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजन्मोत्सव हा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात येतो . या दिवशी वेगवेगळे कार्यक्रम घेऊन हा दिवस साजरा केला जातो . अशाच प्रकारे या दिवसाचे औचित्य साधत बोरखार गावात शिवजन्मोत्सव जंगदम ग्रुप तर्फे मोठ्या उत्साहाने साजरा केला . 

या वेळी त्यांच्या महिला बचत गटांच्या साहाय्याने वेगवेगळया प्रकाचे स्वादिष्ट खाद्यपदार्थ सर्वांना या वेळी मिळावे या हेतू ने खाद्यपदार्थ चा मेळावा भरवण्यात आला होता या मध्ये मांसाहारी व शाकाहारी , पाणीपुरी चाट , मुबई मधील फेमस असलेले वडापाव तसेच मटण चिकन पकोडे , सर्व पकारच्या बिर्याणी इत्यादी स्वादिष्ट खाद्यपदार्थ यांचे मेळाव्यात मांडण्या


त आले होते.


विशेष म्हणजे या बचत गटात सर्व महिला या आवर्जून सहभागी झाल्या होत्या .या बचत गटात विंधणे ग्रुपग्रामपंचयात याच्या सरपंच मा. सौ. निसर्गा रोशन डाकी. अंगणवाडी सेविक,इतर सामाजिक कार्यकर्त्या महिलांनी या मध्ये मोठ्या आनंदाने या मध्ये सहभागी झाल्या होत्या .हा कार्यक्रम सायंकाळ झाल्यामुळे या कार्यक्रमात छोट्यांच्या किलबिलाट सह वयोवृद्ध यांनी मोठ्या आनंदाने स्वादिष्ट खाण्याचा आस्वाद घेतला . तसेच या मेळाव्यात आलेल्या सर्व ग्रामस्थांनी खाद्यपदार्थ आणि चविबाबत छान कौतुक केले.तसेच भविष्यात असे खाद्यपदार्थ मेळावे दरवर्षी मांडण्यात यावे अशी मागणी या वेळी ग्रामस्थांनी केली. 







Comments

Popular posts from this blog