पूजा चव्हाण
राष्ट्रीय रस्ता सुरक्षा २०२४ अभियानांतर्गत दुचाकी स्वारांना मोफत हेल्मेट वाटप.
न्हावाशेवा वाहतूक शाखा व ए,पी,एम टर्मिनल पोर्ट यांच्या वतीने सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने परिसरातील मोटार सायकल चालकांना सुरक्षित व सुरक्षिततेविषयी घ्यावयाची काळजी बाबत न्हावा शेवा वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर. यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी न्हावाशेवा वाहतूक शाखेच्या व ए,पी,एम टर्मिनल पोर्ट यांच्यावतीने वाहन चालकांना मोफत हेल्मेट वाटप करण्यात आले. यावेळी अधिक माहिती देताना मुजावर यांनी सांगितले की वाहन चालकांनी रस्त्यावरून वाहतूक करत असताना अपघात होऊ नये. यासाठी काळजी घ्यावी, त्याचबरोबर हेल्मेटचा वापर करणे गरजेचे आहे.अनेक दुचाकी स्वार वाहन चालवत असताना हेल्मेट वापरत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने हा रस्ता सुरक्षा अभियान 2024 च्या अनुषंगाने उपक्रम घेऊन नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी,यासाठी हा कार्यक्रम घेण्यात आला होता.
यावेळी न्हावाशेवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. मुजावर, ए,पी,एम टर्मिनल चे सी.ई.ओ शेशगिरी राव,अविनाश कळसे, राजेश सिंग, मनोज पांडे, देवेंद्र म्हात्रे, श्याम घाग, नितीन म्हात्रे, संतोष सावंत, पोलीस हवालदार प्रमोद पाटील, व इतर कर्मचारी तसेच वाहक चालक यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment