आवाज कोकणचा / सिंधुदुर्ग
अशोक म्हात्रे 

महिला उत्कर्ष समितीच्या ज्योतिका हरयान व दीपा ताटे यांचा आगळा वेगळा उपक्रम....


पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत स्थापित महिला उत्कर्ष समितीच्या कोकण अध्यक्ष सौ. ज्योतीका हरयाण व सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष सौ. दीपा ताटे यांनी पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य पतसंस्था ओरोस येथील सभागृहात जगभरात प्रमाण वाढलेल्या हार्ट अटॅक या रोगविषयी जनजागृति व्हावी तसेच प्राथमिक उपचार माहित व्हावेत या साठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात केले होते. 

बॅरिस्टर नाथ पै. नर्सिंग कॉलेज कुडाळ ची विद्यार्थिनी जयश्री चव्हाण हिने डॉ. अशोक म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली CPR ( cardiac pulmonary resuscitation )या प्राथमिक उपचाराचे प्रात्यक्षिक करून दाखविले.


हार्ट अटॅक या आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. वरवर स्वस्थ दिसणाऱ्या अनेक व्यक्ती या आजाराने अचानक जगाचा निरोप घेताना दिसत आहेत. 


महिला उत्कर्ष समिती नेहमीच सामाजिक जाणिवेचे भान राखत अनेक समाज उपयोगी कार्यक्रम पार पाडत असते त्यातच समाजाप्रती आपण काहीतरी देणे लागतो ही जाणीव मनात ठेवून तन, मन, धनाने कार्य करणाऱ्या या दोन सिंधू कन्यांनी जिल्ह्यातील महिलांना एकत्र आणत आपल्या सहकाऱ्यांसह हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करून त्या माध्यमातून हार्ट अटॅक विषयाची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य केले.
या कार्यक्रमासाठी प्रदेश कार्याध्यक्ष श्रृती उरणकर, जिल्हा उपाध्यक्ष नेहा कोळंबकर, कुडाळ तालुका अध्यक्ष तन्वी सावंत, मालवण तालुका अध्यक्ष पल्लवी तारी, कणकवली तालुका अध्यक्ष स्नेहा शेळके, सावंतवाडी तालुका अध्यक्ष वर्षा वरक, कुडाळ उपाध्यक्ष सुस्मिता राणे, कुडाळ सचिव नेहा परब, मालवण तालुका सचिव समृद्धी धुरी सदस्य दूर्वा मानकर, स्वरदा खांडेकर, रूपाली वरक, दीप्ती चव्हाण  यांच्यासह अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या.



Comments

Popular posts from this blog