शिवदेश सामाजिक संस्थेकडून शिवजयंती उत्साहात साजरी

 शिवदेश सामाजिक संस्थेकडून शिवजयंती उत्साहात साजरी


पनवेल /आवाज कोकणचा

१९ फेब्रुवारी म्हणजे आखंड हिंदुस्तानचे आराध्यदैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती. महाराजांच्या जयंती निमित्त सर्वत्र विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. तसाच यावर्षी एक वेगळा कार्यक्रम * शिवदेश सामाजिक संस्था (ट्रस्ट)* या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. तो म्हणजे दरवर्षी प्रमाणे डीजे व पटाके स्टेज या गोष्टींसाठी खर्च करण्यापेक्षा समाजातील सामान्यातील सामान्य माणसा पर्यंत जाऊन त्यांना शिवजंतीचे महत्व व नैसर्गिक वस्तूच जतन याविषयी माहिती देऊन , उपस्थित सर्व गावातील महिला व पुरुष व लहान मुले यांना खाऊ वाटप व नविन कपड्यांचे वाटप करण्यात यावे असा ठराव संस्थेने घेऊन,चौक जवळील नढाळच्या वाडीमध्ये हा कार्यक्रम खुप थाटामाटात पार पडला .

या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष- श्री शिवाजीराव देशमुख उपाध्याक्ष - श्री संतोष जांभळे सचिव- सुधीर सोमवंशी रायगड जिल्हाअध्यक्ष- श्री उमेश खुडे व तालुका अध्यक्ष- श्री नंदकुमार मोरे व नेहमी सामाजिक कार्य करण्यासाठी कार्यरत असणारे श्री. संतोष देशमुख, दिलीप गायकर , आखिलेश फुलार, व हरेश्वर कोळेकर व गावातील पोलिस पाटील श्री नथुराम पाटील काका व माझे वडील श्री श्रीमंत सोमवंशी, व सर्व गावातील सर्व  महिला पुरुष व लहान थोर मंडळी यांच्या उपस्थितीत पार पडला.


विशेष म्हणजे तालुका अध्यक्ष श्री नंदुकुमार मोरे यांच्या प्रयत्नाने व नथुराम काका यांनी केलेली कार्यक्रमाची व्यवस्था व कार्यक्रवासांठी खाऊ वाटप व नविन कपड्यांसाठी देणगी देणाऱ्या व संस्थेत वर्गणी जमा करण्याऱ्या सर्व सभासदांचे विषेश आभार



Comments

Popular posts from this blog