उरण एस.टी. आगारात अपघात स्वच्छता कामगार महिलेला बसखाली चिरडले...
उरण एस.टी. आगारात अपघात स्वच्छता कामगार महिलेला बसखाली चिरडले...
उरण:- पूजा चव्हाण
27 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी पहाटे 6 च्या सुमारास उरण एस. टी.स्थानकात साफ सफाईचे काम करत असलेली महिला कलिंदा भीमराव शरणागत वय वर्ष 52 या महिलांचा बस खाली चिरडून मृत्यू झाला.
उरण एस.टी.आगारांतील बस सफाईचे काम कालींदा शरणावतगेली 4 वर्ष ठेकेदारी पद्धतीने करीत होत्या,आज सकाळी त्या नियमितपणे साफसफाई करीत असताना याच आगारांतील महामंडळाची क्र.MH-20 BL 2430 बस चालक मागे घेत असतना या बसच्या चालकाने बस मागच्या बाजूस काम करत असलेल्या कालींदा शरणावत यांना पहिले नाही,वास्तविक बस मागे घेताना वाहक समवेत असणे गरजेचे असतानाही चालकाने बस मागे घेण्याचा प्रयत्न केला. बस तशीच मागे घेतल्या मुळे मागे साफ सफाई करत असलेल्या कालींदा शरणावत या महिला धक्का लागून त्या बसखाली पडून हा अपघात झाला.
मात्र बस अंगावरून गेल्याने बस खाली चिरडून त्यां जागीच ठार झाल्या. अपघात झाल्यावर कलिंदा यांना रुग्णालयात नेण्यात नेण्यात आले होते. उरण पोलीस ठाण्यात सकाळी या घटनेची नोंद सकाळी 7:00 च्या सुमारास करण्यात आली आहे. अपघातग्रस्थ कालींदा या उरण एस.टी.बस स्थानकाच्या समोरील झोपडपट्टी मध्ये राहत होत्या.त्यामुळे काही क्षणातच त्यांच्या नातेबाईक व सहकार्यांनी एस.टी.बसस्थानकात येऊन ठिया आंदोलन सुरु केल्याने सुमारे 11:30 च्या सुमारास स्थानकांतील बसवाहतूक बंद पडली, स्थानकांतील बस स्थानकात थांबविण्यात आल्या तर पनवेल-दादर-ठाणे व स्थानिक गावांतून उरण बस स्थानकात येणाऱ्या सुमारे 20 ते 22 बस या द्रोणागिरी नोड येथे थांबविण्यात आल्या होत्या.
यावेळी या ठिकाणी या संदर्भात मार्ग काढण्या साठी समाजिक कार्यकर्ते.महिला तसेच भाजपपक्षाचे शहराध्यक्ष रवी भोईर,चाणजे ग्रा.प. सदस्य कैलास भोईर,म्हातवली ग्रा.प. सदस्य संदीप ससाणे.उरण पोइस ठाण्याचे क्राइम पीं.आय.संदीप निकम,तर एस.टी.मंडळाचे मुंबई-पुणे प्रादेशिक विभागाचे प्रमुख.श्रीनिवास जोशी.विभग नियंत्रक गुलाब बच्छाव आदि उपस्थित होते. कालींदा शरणावत यांच्या नातेबायीकानी कालींदा शरणावत याच्या एका मुलास आईच्या जागेवर नोकरीत सामाऊन घेण्य साठी आग्रह धरला मात्र एस.टी.मंडळाच्या अधिकाऱ्यांनी ते नियमात बसत नसल्याचे सांगून हाप्रस्ताव धुडकावून लावला व तातडीची मदत म्हणून नियमांत असणारे 10000/- रुपये देण्याचे सांगून नियमानुसार सर्व योग्यती कागदपत्रे सादर केल्या नंतर नियमानुसार10लख रुपये देण्यात येणार असलायची भूमिका स्पष्ट केली.मात्र हीमान्य नसल्याने चर्चा पुढे सुरु राहिली दरम्यान उपस्थित पत्रकारांनी दोन्ही पक्षांना इयत्ता 12 वीच्या परीक्षा सुरु असल्याने बस सुरु कराव्यात अशी विनती केली त्यानुसार निर्णय घेऊन बस सुरु करणात आल्या
Comments
Post a Comment