सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार.

 सैन्य दलात निवड झाल्याने कोन गावातील अग्निवीर प्रबोध म्हात्रे चा सत्कार.

पनवेल ता.२८ (बातमीदार अशोक घरत ) 
*पनवेल तालुक्यातील कोन गावातील सुपुत्र प्रबोध नंदकिशोर म्हात्रे याने आपले सैनिकीय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याची केंद्र शासनाच्या अग्निपथ योजनेमध्ये सैन्य भरती झाल्याने कोन ग्राम पंचायतीच्या वतीने त्याचा अग्निवीर म्हणून सन्मान करण्यात आला.*
   
   *प्रबोध म्हात्रे याची अग्निवीर म्हणून भारतीय सैन्य दलात चार वर्षासाठी निवड झालेली असल्याने त्याचा सत्कार सन्मान समारंभ आयोजित केला होता.प्रबोध याचे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एक दोन वर्षे तो कोल्हापूरमध्ये एका सैनिकी अकॅडमी मध्ये शिक्षण घेत होता.घरची परिस्थिती बेताची असल्याने तो त्याच्या मामाच्या सहकार्याने सर्वकाही शिक्षण घेत होता.कोल्हापूरला सैनिकी अकॅडमी मध्ये शिक्षण घेऊन देशासाठी काही तरी करायचे,हे ध्येय मनाशी बाळगून त्याने आपले शिक्षण पूर्ण केले.आज त्याची भारतीय सैन्य दलात अग्नीवर म्हणून निवड झाल्याने संपूर्ण गावाला त्याचा अभिमान वाटला म्हणून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.*
*कोन ग्रामपंचायत कार्यालय येथे आयोजित या सत्कार समारंभाला ग्रामपंचायतच्या सरपंच अश्विनी जितेश शिसवे व ग्राम पंचायतचे सदस्य अक्षय घरत,दीपक म्हात्रे,साहिल म्हात्रे,सदस्या निकिता घरत,नीता म्हात्रे,सदस्य धनराज बडे,संजय जाधव,सदस्या अस्मिता गायकर,ताई बाई पाटील,अंजनी पाटील आणि ग्राम विकास अधिकारी रमेश तारेकर व माजी उपसरपंच जितेश शिसवे,आदेश घरत,नितीन म्हात्रे,अमित गायकर,काशिनाथ म्हात्रे,अनंत दिघे(सोमटणे),सरोज म्हात्रे,शिल्पा म्हात्रे,मनीषा म्हात्रे,प्रचिता दिघे,निर्मला म्हात्रे या सर्वांच्या उपस्थितीत प्रबोध म्हात्रे याचा शाल,श्रीफळ,पुष्पगुच्छ व ट्रॉफी देवून सत्कार करण्यात आला.*
झालास बाळा सेनेत दाखल 
*उंचावले कोन गावचे नाव*
आम्हा सर्वांचे आशिष तुला
*आमच्या हृदयी तुझा ठाव*
धन्य धन्य कोनवासी
*जिथे जन्मला प्रबोध*
घ्यायचा आहे तुला रे
*बाळा शत्रूंशी प्रतिशोध*
 *या काव्य पंक्तींनी अशोक घरत यांनी त्याच्या विषयीचा अभिमान बाळगत आपले मनोगत व्यक्त केले.सर्वात शेवटी ग्राम पंचायत कमिटी व उपस्थितांचे आभार मानले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार अशोक घरत यांनी केले.



Comments

Popular posts from this blog