न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर शाळेची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी निवड...
न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर शाळेची विद्यार्थिनी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी निवड...
पनवेल/आवाज कोकणचा
अतिशय वेगाने विकसित होत असणाऱ्या पनवेल मधील सुकापुर येथील न्यू इंग्लिश स्कूल सूकापुर या शाळेची विद्यार्थिनी कुमारी निर्मिती दत्ता हिची खेलो इंडिया वुमन्स लीग 2024 साठी तायक्वांदो खेळासाठी महाराष्ट्रातून निवड झाली आहे .
तसेच पांडिचेरी येथे पार पडलेल्या खेलो इंडिया तायक्वांदो वुमन्स लीग 2024 स्पर्धेत तिने तिसरा क्रमांक मिळवून ब्राँझ पदक पटकावले आहे .
अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेत असलेले अनेक विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कूल सुकापुर येथे शिक्षण घेत आहेत. शाळेचे संचालक श्री निळकंठ पाटील हे विद्यार्थ्यांप्रती घेत असलेल्या अविरत कार्यशैलीमुळे या शाळेचे विद्यार्थी सध्या वेगवेगळ्या क्षेत्रात नैपुण्य मिळवताना दिसत आहेत.
शाळेच्या संचालिका सौ अपर्णा पाटील ,पर्यवेक्षक श्रीमती रीना बिजू, मुख्याध्यापिका सौ माधुरी म्हात्रे तसेच प्रशिक्षक श्री दिनेश या सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन निर्मिती दत्ता हिला मिळाले आहे .
तिच्या या यशामुळे शाळेसह समाजातील विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे , सचिव डॉ. वैभव पाटील, खजिनदार श्री शैलेश ठाकूर तसेच पत्रकार उत्कर्ष समिती अंतर्गत महिला उत्कर्ष समिती महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, उपाध्यक्ष आरती पाटील, सचिव एडवोकेट दिव्या लोकरे यांनी तिच्या या निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.
Comments
Post a Comment