४ मार्च रोजी उरण येथे उध्दव ठाकरे यांचा झंझावाती जनसंवाद दौरा , (उबाठा गट ) रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर भोईर यांची माहिती.

 ४ मार्च  रोजी उरण येथे उध्दव ठाकरे यांचा  झंझावाती जनसंवाद दौरा , (उबाठा गट ) रायगड जिल्हा अध्यक्ष मनोहर भोईर यांची माहिती.

उरण/आवाज कोकणचा

महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे गट ) ,कॉग्रेस, राष्ट्रवादी ( शरद पवार गट ) , शेकाप, समाजवादी पार्टी आदी घटक पक्षांचे नेते , पुढारी यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ लोकसभा मतदारसंघातील पनवेल, खालापूर,उरण  या तीन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ४ मार्च रोजी तीन सभा होणार आहेत. 

या झंझावाती जनसंवाद दौऱ्यात उरण विधानसभा मतदार संघात शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या या जनसंवाद मेळाव्याला माजी खासदार अनंत गीते, मिलिंद नार्वेकर, संतोष वाघले पाटील, महाआघाडीतील शेकापचे आमदार जयंत पाटील, माजी आमदार बाळाराम पाटील, कॉग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, आर.सी.पाटील, राष्ट्रवादी  शरद पवार गटाचे प्रशांत पाटील समाजवादी पार्टीचे

अनंत पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

शेतकऱ्यांच्या प्रचंड विरोधानंतरही होऊ घातलेला विरार-अलिबाग कॉरीडॉर, नैना प्रकल्प , तिसरी मुंबई, नियोजित एमआयडीसी प्रकल्प खोपटा नवनगर प्रकल्प, सिडकोचे प्रलंबित विविध प्रश्न, उरण येथील रखडलेल्या १०० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय, इंजिनिअरिंग कॉलेज, रानसई धरणाची उंची आणि गाळाची समस्या, रखडत सुरू असलेले करंजा मच्छीमार बंदर, नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधीत प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, जेएनपीए व सिडको प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा अद्यापही न सुटलेला साडेबारा टक्के भूखंड वाटपाचा प्रश्न, जेएनपीए विस्थापित करून पुनर्वसित नवीन शेवा, हनुमान कोळीवाडा ग्रामस्थांचा प्रश्न, बेरोजगारी , नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या आणि राज्यातील  महायुतीच्या अनागोंदी, मनमानी कारभाराचा उध्दव ठाकरे ठाकरी भाषेत  समाचार घेणार आहेत.

उरण येथील द्रोणगिरी नोडमधील  शांतेश्वरी मैदानावर 

सायंकाळी होणाऱ्या या  जनसंवाद मेळाव्यात परिसरातील समस्यांचाही उहापोह केला जाणार असल्याची माहिती उरणचे माजी आमदार तथा शिवसेना जिल्हा प्रमुख मनोहरशेठ भोईर यांनी  शनिवारी उरण येथे त्यांच्या निवासस्थानी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून माहिती दिली.

याप्रसंगी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, उरण संपर्क प्रमुख दिपक भोईर, पनवेल येथील ज्येष्ठ शिवसैनिक काशिनाथ कांबळे व इतर पदाधिकारी या पत्रकार परिषदेला  उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog