जागतिक महिला दिनानिमित्त नवी मुंबई येथे महिला उत्कर्ष समितीच्या महिलांच्या म्युझिक स्टुडिओचा शुभारंभ...

आवाज कोकणचा / नवी मुंबई

प्रतिनिधी - 10 मार्च 24


नवी मुंबई येथील महिला उत्कर्ष समितीच्या सदस्या सौ. मीरा जाधव यांच्यासह अशोक डिका सुभाष कुमार यांनी एकत्र येत समितीच्या महिलांना गायन प्रशिक्षण वर्ग सुरू केला होता.



या संगीत वर्गातून प्रशिक्षित होऊन तुर्भे विभाग अध्यक्ष वंदना अंबवले, राणी दळवी यांच्यासह अखिला शेट्टी , दिव्या शिंदे, वर्षा पाटील , प्रमिला सोनवणे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.



कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या नवी मुंबई विभागातील ज्येष्ठ कार्यतत्पर समाजसेविका कविता पाटील, अध्यक्षपदी पत्रकार उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉ. अशोक म्हात्रे, ॲड. दिव्या लोकरे, ॲड. संगीता शेटे, मीरा जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली.



त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा पार पडला.



गायन क्षेत्रातील प्रचलित नाव असलेल्या अशोक यांनी उत्तम सूत्रसंचालन करत उपस्थित प्रेक्षक वर्गाला खीळवून ठेवले.


गायिका राणी दळवी व दिव्या शिंदे यांनी द्वंदगीत गाऊन आपल्या जादुई आवाजाने सर्वांना मंत्रमुग्ध केले तर गायिका अखीला शेट्टी व वंदना आंबावले यांनी आपल्या सुरांनी उपस्थितांमध्ये जोश भरून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

Comments

  1. Khoop khoop Abhar Dr Ashok Mahatre Saheb & Vaibhav Patil saheb & Awaaz Konkanacha Sarvana MUSIC MASALA STUDIO tarfe khoop khoop Abhar Abhar Abhar,,,,🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog